👁 6 Views

विश्‍वभुषण डॉ.बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठानला महाराष्ट्र शासनाचा समाजभुषण पुरस्कार जाहीर…शासनाच्या प्रतिष्ठेच्या पुरस्काराचा पंढरपूरला प्रथमच बहुमान

पंढरपूर LIVE 29 Jun 2018

विश्‍वभुषण डॉ.बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठानने गेल्या 14 वर्षापासून सामाजिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने देण्यात येणारा व अतिशय प्रतिष्ठेचा समजला जाणारा 2017-18 या वर्षाचा डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाजभुषण पुरस्कार जाहीर झाला आहे.या पुरस्कारासाठी 61 व्यक्तिं व सहा संस्थांची निवड करण्यात आली आहे यामध्ये विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठानचा समावेश आहे.नुसूचित जाती, जमाती, विमुक्त जाती व भटक्या जमाती आदी विविध समाजातील लोकांसाठी कार्य करणार्‍या कार्यकर्ते व संस्थांच्या कामाची दखल घेऊन राज्य शासनामार्फत कर्मवीर दादासाहेब गायकवाड पुरस्कार व डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार देण्यात येतात. सन 2017-18 या वर्षाच्या पुरस्कारांसाठी संस्था व व्यक्तिंची निवड समितीने केली आहे.3 जुलै रोजी नागपूर येथे भव्य कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले,राज्यमंत्री दिलीप कांबळे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत या पुरस्काराचे वितरण होणार आहे.
       या बाबत अधिक माहीती देताना विश्‍वभषुण डॉ.बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष नगरसेवक डि.राज सर्वगोड म्हणाले की,तब्बल दहा वर्षानंतर सोलापूर जिल्ह्यात हा पुरस्कार प्राप्त होत आहे.तर पंढरपूर शहर तालुक्यात पुरस्काराचा मानकरी ठरलेली ही पहीलीच संस्था आहे.प्रतिष्ठानच्या वतीने गेल्या 14 वर्षापासून आम्ही करीत आलेल्या समाजिक कार्याची शासनस्तरावर दखल घेतली गेल्याने समाधान वाटते.प्रतिष्ठानच्या माध्यमातून आम्ही नैसर्गीक आपत्ती पिडीतांना व पुरग्रस्तांना शासकिय मदत मिळवून देणे,सुशिक्षीत बेरोगारांसाठी वेळोवेळी कार्यशाळेचे आयोजन करणे,एडसबाबत जनजागरण मोहीम राबवीणे,दुष्काळी परिस्थीतीत आवश्यक ठिकाणी टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणे,पाणी बचतीसाठी जनजागृती अभियान राबवीणे,नळाच्या तोटयांचे मोफत वाटप करणे,वनाराई परिसरात पशुपक्षासाठी पाणी पुरवठा करणे,अंध दिव्यांग शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय गणवेश वाटप करणे,नेत्रतपासणी शिबीराचे आयोजन करुन गरजुंना मोफत चष्मे वाटप करणे, गरजुंना तातडीने व कमी दरात रक्त उपलब्ध करुन देण्यासाठी सहकार्य करणे,चंद्रभागेच्या वाळवंटात निर्मल कलश ठेवण्यासाठी व वाळवंट स्वच्छतेसाठी पाठपुरावा करणे,ग्रामिण भागातील हुशार व गरजू विद्यार्थ्यांना मोफत एस.टी.पास वाटप करणे.पत्रकार दिन व डॉक्टर्स डे साजरा करीत असताना समाजातील व्यक्तीविशेष कार्याची दखल घेवुन गौरव करणे यासह अनेकविध कामे या प्रतिष्ठानच्या माध्यमातून केली आहेत.तर समाजातील उल्लेखनीय कार्य करणार्‍या व्यक्ती व संस्थांचा आतापर्यंत शंभर पुरस्कार देवून गौरव करण्यात आला आहे.
     प्रतिष्ठानच्या या उल्लेखनीय कार्याची दखल घेत शासनाने हा पुरस्कार संस्थेस जाहीर केला आहे.हा पुरस्कार जाहीर झाल्याचे समजताच नगरसेवक डि.राज सर्वगोड व त्यांचे सर्व सहकारी,प्रतिष्ठानचे पदाधिकारी यांचे केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री  ना.रामदास आठवले,आ.भारत भालके,संसदरत्न खासदार धनंजय महाडिक,आ.दत्तात्रय सावंत,चेअरमन कल्याणराव काळे यांच्यासह अनेकांनी अभिनंदन केले आहे.


महाराष्ट्रातील नंबर वन! 

ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!! 

गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 15 जुलै 2018 रोजी 24 लाखाच्याही पुढे गेलेली असून लवकरच 25 लाख वाचकांचा टप्पा पंढरपूर लाईव्ह पार पाडणार आहे.

कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

उपसंपादक – विजयकुमार गायकवाड 

  • Whatsup- 8308838111  , 7083980165 Mobile- 7972287368,  7083980165  
  • mail-livepandharpur@gmail.com
  • web – http://www.pandharpurlive.com

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *