पंढरपूर LIVE 2 July 2018
श्री.खोलेश्वर विद्यालयाचा गुणगौरव सोहळा संपन्न
अंबाजोगाई ( २८ )संस्कारक्षम शिक्षणची शिदोरी बरोबर देऊन आपल्या प्रगतीकडे वाटचाल करण्याची दिशा शिक्षकच देऊ शकतात व हे काम भाशिप्र संस्थेच्या खोलेश्वर माध्यमिक विद्यालयातील शिक्षकांनी केले आहे .विद्यार्थ्यांच्या यशात व जडणघडणीत खोलेश्वर विद्यालयाचा सिंहाचा वाटा आहे असे प्रतिपादन सुप्रसिद्ध सिने अभिनेते श्री.गिरीष कुलकर्णी यांनी केले .
भाशिप्र. संस्थेच्या श्री. खोलेश्वर माध्यमिक विद्यालयाच्या शालांत व विविध परिक्षेतील गुणवंतांचा गुणगौरव आद्यकवी मुकुंदराज सांस्कृतिक सभागृहात पार पडला त्याप्रसंगी ते बोलत होते . कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपजिल्हाधिकारी मा.श्री.शिवकुमार स्वामी हे होते तर श्री.खोलेश्वर विद्यालयाचे माजी विद्यार्थी तथा बृहन्मुंबई महानगर पालिकेचे सहाय्यक अभियंता मा.श्री.नवनाथ घाडगे , गटशिक्षणाधिकारी श्री.नागनाथ शिंदे, संस्थेचे कोषाध्यक्ष मा.श्री.विनायक पोखरीकर , श्री.आप्पाराव यादव ,स्थानिक समन्वय समितीचे अध्यक्ष अॅड.श्री.किशोर गिरवलकर , स्थानिक कार्यवाह मा.श्री.बिपीन क्षिरसागर,शालेय समिती अध्यक्ष प्रा.श्री.शशिकांत टेकाळे, डॉ. श्री.अतुल देशपांडे , मुख्याध्यापक श्री.संतोष देशमुख हे व्यासपिठावर उपस्थित होते .
आदर्श संस्कार व विचार देणाऱ्या श्री.खोलेश्वर विद्यालयाविषयी आपली आदराची भावना आहे .मराठवाड्यातील ही एक उत्तम व आदर्श संस्था आहे ,केवळ गुणांच्या जोखाडात न राहता त्यापलिकडे आपण प्रगती करू शकतो ही भावना विद्यार्थ्यांमध्ये रुजविण्याची गरज असून हे काम खोलेश्वर विद्यालयाने विविध उपक्रमांच्या माध्यमातून साध्य केले आहे . मुक्तसंवाद हा कुठेच दिसत नाही आमूक एका विचाराचे दडपण पालकांकडून विद्यार्थ्यांवर लादले जाते हे चित्र बदलण्याची गरज असल्याचे ते म्हणाले .समाजाच्या जडणघडणीत कलाकारांचे मोलाचे योगदान आहे ,समाजाच्या व्यथा कलाकार आपल्या अभिनयातून व लेखणा तून मांडतो हा विचार घेवूनच आपण कलाक्षेत्राकडे वळलो .केवळ अभियांत्रिकी किंवा वैद्यकीय या क्षेत्रातच आपली प्रगती होते असे नव्हे तर कलाक्षेत्रही विद्यार्थ्यांच्या प्रगतीला आधार ठरते असे ते म्हणाले .
दस्तगीरवाडी ते मुंबईतील अधिकारी हा प्रवास करतांना येणाऱ्या संघर्षाशी सामना करतांना श्री . खोलेश्वर विद्यालयान दिलेली संस्काराची व आधाराची शिदोरी यामुळेच यश मिळाले. गुणवंतांनी आपल्या ज्ञानाचा उपयोग समाजहीतासाठी करावा असे आवाहन श्री .नवनाथ घाडगे यांनी केले .
आपल्या अध्यक्षीय भाषणात उपजिल्हाधिकारी मा. श्री शिवकुमार स्वामी म्हणाले की , जिद्द व चिकाटी मनात ठेवली तर यश हमखास मिळते , विद्यार्थ्यांनी या सूत्राचा उपयोग आपल्या जीवनात करावा.
कार्यक्रमाच्या प्रारंभी एन .सी.सी. च्या विद्यार्थ्यांनी मान्यवरांना मानवंदना दिली, नंतर मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले व मान्यवरांचा यथोचित सत्कार करण्यात आला . त्यानंतर या कार्यक्रमात गुणवंत विद्यार्थी व पालकांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी श्री जयंद्र कुलकर्णी व त्यांच्या चमूने पद्य सादर केले . मुख्याध्यापक श्री . संतोष देशमुख यांनी प्रास्ताविकात शाळेच्या भौतिक व गुणात्मक विकासाची माहीती दिली .
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सौ .जयश्री इटकूरकर , सौ . भावना कुलकर्णी, श्री .श्रीकांत काळे , श्री .मोरेश्वर देशपांडे यांनी केले तर उपस्थितांचे आभार उपमुख्याध्यापक श्री .प्रदीप देशमुख यांनी मानले .
याप्रसंगी संस्था सभासद, माजी शिक्षक, पत्रकार, अनेक मान्यवर व प्रतिष्ठीत नागरिक उपस्थित होते. उपमुख्याध्यापक श्री.प्रदीप देशमुख , पर्यवेक्षक श्री.अरूण पत्की , श्री.प्रशांत पिंपळे तसेच सर्व शिक्षक बंधुभगीनी, कर्मचारी यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परीश्रम घेतले

महाराष्ट्रातील नंबर वन!
ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 15 जुलै 2018 रोजी 24 लाखाच्याही पुढे गेलेली असून लवकरच 25 लाख वाचकांचा टप्पा पंढरपूर लाईव्ह पार पाडणार आहे.
कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
उपसंपादक – विजयकुमार गायकवाड
- Whatsup- 8308838111 , 7083980165 Mobile- 7972287368, 7083980165
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com