👁 8 Views

पंढरपुर : आ.समाधान आवताडे यांचा कासेगावात जंगी सत्कार

पंढरपूर मंगळवेढा विधानसभा पोटनिवडनुकीमध्ये  ज्याप्रमाणे कासेगाव येथील जनतेला आपल्या गावच्या धोरणात्मक विकासासाठी हवा तेवढा निधी उपलब्ध करून देऊ असा शब्द दिला होता. दिलेला शब्द शिरोधैर्य ठेवून एका वर्षात भरघोस निधी मंजूर करून दिल्याबद्दल व आमदार समाधान दादा आवताडे यांची जिल्हा नियोजन समिती वर विशेष सदस्य म्हणून निवड झाल्याबद्दल त्यांचा जंगी स्वागत पर सत्कार करण्यात आला.


यावेळी आमदार महोदय यांनी आपल्या भाषणात बोलताना तालुक्यातील  व पंचक्रोशीतील हजारो युवकांना रोजगार देण्याचे उद्देश डोळ्यासमोर ठेवत 

  त्या अनुषंगाने  लवकरच MIDC च्या कामास लवकरच प्रारंभ होणार असल्याचे सांगितले .


तसेच आपल्या ला पाणी प्रश्न असू द्या लाईट चा प्रश्न असू द्या किंवा रस्ते असू द्या त्या प्रश्ना साठी कायम कटिबध्द राहून आपले सर्व प्रश्न मार्गी लावण्यासाठी सदैव प्रयत्नशिल असल्याचेही त्यांनी आवर्जून यावेळी सांगितले.

मतदार संघात पाहिजे तिथे पाहिजे तेवढ्या निधीची मागणी करा कारण केंद्रात पण आपले सरकार आणि राज्यात पण आपले सरकार डबल इंजिन सरकार आहे निधीला कमी पडू देणार नाही फक्त तुम्ही मागणीला कमी पडू नका 


यावेळी सत्कार समारंभ संपन्न होत असताना श्री.विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन साखर सम्राट श्री. अभिजीत आबा पाटील यांनी शेतकऱ्यांचा बंद पडलेला राजवाडा चालू केल्याचे सांगत यांच्या ही कामाची प्रशंशा करीत त्यांचे कौतुक केले 

यावेळी श्री.विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन श्री.अभिजित आबा पाटील,तसेच व्हा.चेअरमन डॉ. बी पी रोंगे सर, मारापुरचे लोकनियुक्त सरपंच विनायक यादव,श्री.तुकाराम आबा कूरे, गट नेते श्री समाधान घायाळ,श्री.भास्कर घायाळ,श्री.लक्ष्मण जाधव,श्री.भिमा आबा भुसे, हनुमंत ताटे,श्री. पांडूरंग खिलारे,अनिकेत देशमुख,श्री. औदुंबर निकम,श्री.विठ्ठल लवटे महाराज,श्री.मारुती नाना काळे मेंबर,श्री.संभाजी पाटील,श्री.संभाजी कुरे,तसेच भुसे परिवारातील सर्व सदस्य पदाधिकारी ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *