👁 9 Views

थेट द्वितीय वर्ष प्रवेशाच्या इंजिनिअरींग पदवी व बी.फार्मसी पदवीच्या ऑनलाईन रजिस्ट्रेशन करण्यासाठी स्वेरीत प्रचंड गर्दी!

पंढरपूर LIVE 9 July 2018

पंढरपूरः- गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अॅण्ड रिसर्च इन्स्टिटयूट संचलित इंजिनिअरींग (पदवी) व बी.फार्मसी (पदवी) यांच्या थेट द्वितीय वर्ष प्रवेश प्रकियेसाठी फॅसिलिटेशन सेंटर (एफ.सी.) ची प्रक्रिया सुरु झाली असून ऑनलाईन रजिस्ट्रेशन करण्यासाठी तसेच अचूक व खात्रीशीर फॉर्म भरण्यासाठी विद्यार्थ्यांनी एफ.सी. केंद्रावर पहिल्या दिवसापासूनच प्रचंड गर्दी केल्याचे दिसत आहे. इंजिनिअरींगची ६ जुलै २०१८ पासून सुरु झाली असून बी फार्मसीची ९ जुलै २०१८ (सोमवार) पासून सुरु झाली आहे. दोन्ही अभ्यासक्रमांची २० जुलै २०१८ अभियांत्रिकीसाठी व १६ जुलै २०१८ ही फार्मसीसाठी अशा प्रकारे ऑनलाईन रजिस्ट्रेशन करण्याची अंतिम तारीख आहे.’ अशी माहीती श्री विठ्ठल एज्युकेशन अॅण्ड रिसर्च इन्स्टिटयूटचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ. बी. पी. रोंगे यांनी दिली. 
        थेट द्वितीय वर्ष इंजिनिअरींग(पदवी) व थेट द्वितीय वर्ष बी.फार्मसी (पदवी) च्या सन २०१८-१९ प्रवेशाकरीता ऑनलाईन रजिस्ट्रेशन फॉर्म भरणेभरलेले अर्ज स्विकारुन कागदपत्रांची तपासणी, पडताळणीछाननी अर्ज कायम करणे आदी प्रक्रिया करण्याकरिता मुंबई येथील मा. संचालकतंत्रशिक्षण संचालनालय,महाराष्ट्र राज्य (डी.टी.ई) यांचे अधिकृत केंद्र म्हणून मान्यता मिळाली आहे. पंढरपूर पंचक्रोशीतील व ग्रामीण भागातील विद्यार्थी व पालक यांच्यासाठी थेट द्वितीय वर्षातील इंजिनिअरींग (पदवी- एफ.सी. क्रमांक ६२२०) व बी.फार्मसी (पदवी- एफ.सी. क्रमांक ६३९७) प्रवेश प्रकियेचे मार्गदर्शनसंबधीत कागदपत्रे जमवाजमव करताना होणारी अडचण व आदी शंकाबाबत मार्गदर्शन करण्यासाठी हे केंद्र सुरु केले आहे. यासाठी विद्यार्थ्यांनी एफ.सी. केंद्रावर प्रचंड गर्दी केल्याचे दिसत आहे. यामध्ये माढामोहोळसांगोला, करमाळापंढरपूर,मंगळवेढाअक्कलकोट, माळशिरस, आटपाडी, जत, इंदापूर या तालुक्यातील विद्यार्थ्यांसह आसपासच्या ठिकाणचे विद्यार्थींदेखील येथे येवून अत्यंत शिस्तीत ऑनलाईन रजिस्ट्रेशन करत आहेत. या रजिस्ट्रेशन प्रकियेची अंतिम मुदत इंजिनिअरींग करीता २० जुलै व व बी. फार्मसीकरीता १६ जुलै २०१८ असे असणार आहेत. त्यानंतरपुढे  संबंधित प्रमाणपत्रे व कागदपत्रे दुरुस्ती प्रक्रिया चालणार आहे. अधिक माहिती  डी.टी.ई.च्या वेबसाईड वरून प्रसिद्ध होईल. थेट द्वितीय वर्षाच्या इंजिनिअरींग (पदवी) प्रवेशाकरिता डिप्लोमा इंजिनिअरींग परिक्षा उत्तीर्ण अथवा बी.एस्सी उत्तीर्ण तसेच बी.फार्मसी (पदवी) प्रवेशाकरिता डिप्लोमा फार्मसी उत्तीर्ण असणाऱ्या विद्यार्थ्यांनाच याचा लाभ घेता येणार आहे. थेट द्वितीय वर्ष पदवी प्रवेशाबाबत अधिक माहितीसाठी इंजिनिअरींग (पदवी) साठी फॅसिलिटेशन सेंटरप्रमुख प्रा. जे.एस.शिंदे (मोबा.क्र.९५१८९३८८४३) व बी. फार्मसी (पदवी) करीता प्रा.वैभव चिपडे (९४२१९६०००३) व दोन्हीसाठी टोल फ्री क्र.१८०० ३००० ४१३१ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. अभियांत्रिकी व बी.फार्मसीच्या प्रथम वर्ष ऑलाईन प्रवेशासाठी मिळालेल्या विक्रमी प्रतिसादाच्या पार्श्वभूमीवरच थेट द्वितीय वर्ष पदवी अभियांत्रिकी व थेट द्वितीय वर्ष बी.फार्मसीच्या प्रवेश प्रक्रियेसाठी प्रचंड गर्दी होत आहे.

  


महाराष्ट्रातील नंबर वन! 

ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!! 

गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 15 जुलै 2018 रोजी 24 लाखाच्याही पुढे गेलेली असून लवकरच 25 लाख वाचकांचा टप्पा पंढरपूर लाईव्ह पार पाडणार आहे.

कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

उपसंपादक – विजयकुमार गायकवाड 

  • Whatsup- 8308838111  , 7083980165 Mobile- 7972287368,  7083980165  
  • mail-livepandharpur@gmail.com
  • web – http://www.pandharpurlive.com

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *