👁 9 Views

जगद्गुरू संत तुकोबांच्या पालखी सोहळयाच्या स्वागतास बारामतीत प्रशासन सज्ज

पंढरपूर LIVE 13 July 2018

 आषाढी वारीसाठी पंढरीकडे निघालेला जगदगुरू संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा आज बारामतीत पार पडत आहे. या सोहळ्यासाठी प्रशासन सज्ज असून पूर्ण तयारी झाली असल्याची माहिती बारामती नगरपालिका प्रशासनाने दिली आहे.

पंढरीत आषाढी यात्रेनिमित्त भरणार “कृषी पंढरी” कृषी महोत्सव-2018 “भव्य कृषी प्रदर्शन” बघा (जाहिरात

पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांना आरोग्य, वाहतूक, पाणीपुरवठा आदी सुविधा पुरविण्यात येणार असून राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापनाची मदत घेण्यात येणार आहे. पालखी मुक्कामाच्या ठिकाणी निवारा, दिवाबत्ती, स्वच्छतागृहांचीही व्यवस्था करण्यात आली आहे.

बारामती शहरांत रस्त्यांच्या बाजुचे गवत काढून स्वच्छ करण्यात आले आहे. शहरातील हॉटेल, हातगाडेधारकांना स्वच्छता, पिण्याच्या पाण्याबाबत नोटीसा देण्यात आल्या. तसेच, पालखी मुक्कामी ( शारदा प्रांगण) येथील मैदान स्वच्छ करण्यात आले आहे. 



शहरांतील ४८ सार्वजनिक ठिकाणी असणाऱ्या स्वच्छतागृहांची दुरुस्ती व स्वच्छता करण्यात आली आहे. हॉटेल, मंगल कार्यालये, पेट्रोल पंप, शाळा अशा सार्वजनिक ठिकाणची स्वच्छतागृहे वारकऱयांसाठी खुली करण्याबाबत नोटीस देण्यात आली आहे. सोहळ्यात सहभागी होणाऱया दिंड्यांच्या स्वागतासाठी प्रशासन सज्ज असल्याचे मुख्याधिकारी योगेश कडूसकर यांनी सांगितले. 

गेल्या १० वर्षांपासून दोन्ही पालखी सोहळ्यात हर्षद पॅकवेल २५० रिकामे बॉक्स कचरा साठवण्यासाठी देत आहेत. समाजसेवा हीच पांडुरंगाची खरी सेवा आहे. आपले शहर स्वच्छ ठेवण्यात वेगळे समाधान आहे. त्यामुळे हर्षद पॅकवेल ही मोहीम राबवीत असल्याचे दिलीप जयंतीलाल दोशी यांनी सांगितले. 

  


महाराष्ट्रातील नंबर वन! 

ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!! 

गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 15 जुलै 2018 रोजी 24 लाखाच्याही पुढे गेलेली असून लवकरच 25 लाख वाचकांचा टप्पा पंढरपूर लाईव्ह पार पाडणार आहे.

कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

उपसंपादक – विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 

Mobile- 7972287368, 8149624977

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web – http://www.pandharpurlive.com

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *