👁 7 Views

पंढरपूर सिंहगड पब्लिक स्कूलच्या चिमुकल्यांनी साकारला वारी सोहळा

पंढरपूर LIVE 19 July 2018

दिंडी सोहळ्यातून चिमुकल्यांनी साधू संतांचा वेष परिधान करून दिला पर्यावरण संदेश

पंढरपूर सिंहगड पब्लिक स्कूलचे चिमुकले संतांचा वेष परिधान करून 
दिंडी सोहळ्यात सहभागी झाले होते.    
पंढरपूर (प्रतिनिधी) महाराष्ट्राच्या संपूर्ण कानाकोप-यातून लाखोंच्या संखेने भाविक भक्त मोठ्या श्रद्धेने दक्षिण काशी समजल्या जाणा-या तीर्थक्षेत्र पंढरपूर मध्ये येत असतात. हा वैष्णवांचा मेळा खूप मोठा असून या वारीत मध्ये सर्व साधु-संतांच्या पालख्या येत असतात. या वारीचे औचित साधून कोर्टी (ता. पंढरपूर) येथील सिंहगड पब्लिक स्कुल मधील लहान चिमुकल्यांनी दिंडी सोहळयातून साधू संतांचा वेष परिधान करून पर्यावरण संदेश देऊन वारी सोहळा संपन्न केला.
     सिंहगड पब्लिक स्कुल मधील प्री-प्रायमरी च्या लहान विद्यार्थ्यांनी विविध संताचे गणवेश परिधान करून दिंडी सोहळ्यात सहभाग घेतला होता. या दिंडी सोहळ्यात संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत सावता माळी महाराज, संत गोरोबा काका, संत जनाबाई, संत मुक्ताबाई आदी संताच्या पोशाखात लहान-लहान विद्यार्थी होते. या दिंडी सोहळ्यात सहभागी झालेल्या लहान मुलींनी डोक्यावर तुलशी घेतलेली होती. अनेक विद्यार्थांच्या गळ्यात टाळ, विना, हातात भगवा पताका घेऊन  मुखात माऊली हे नाम होते.
    या दिंडी सोहळ्यात काही मुलांनी पर्यावरण संरक्षण म्हणजे जंगलाचा फोटो असलेलेल्या फलकावर पांडुरंगा मला वाचवा असे लिहलेले फलक हातात घेऊन माऊली माऊली म्हणत होते. या चिमुकल्यांचा दिंडी सोहळा पाहण्यासाठी अनेकांनी गर्दी केली होती.
    दिंडी सोहळ्यातील सहभागी विद्यार्थ्यांचे पंढरपुर सिंहगड इन्स्टिट्युटचे कॅम्पस डायरेक्टर डॉ. कैलाश करांडे, स्कुलच्या प्राचार्या डॉ. उषा धपोला, प्रा. स्मिता नवले सह अनेक शिक्षक व शिक्षिका सह स्कुलच्या कर्मचा-यांनी या चिमुकल्यांचे कौतुक केले.
पंढरीत आषाढी यात्रेनिमित्त भरणार “कृषी पंढरी” कृषी महोत्सव-2018 “भव्य कृषी प्रदर्शन” बघा (जाहिरात

  


महाराष्ट्रातील नंबर वन! 

ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!! 

गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 26 लाखाच्याही पुढे गेलेली आहे. 50 लाख वाचकांच्या टप्प्याकडे पंढरपूर लाईव्ह झेपावत आहे!

कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

उपसंपादक – विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 

Mobile- 7972287368, 8149624977

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web – http://www.pandharpurlive.com

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *