पंढरपूर LIVE 19 July 2018
जें का रंजलें गांजलें । त्यासि म्हणे जो आपुलें ।।१।।
तो चि साधु ओळखावा । देव तेथें चि जाणावा ।।ध्रु.।।
मृदु सबाह्य नवनीत । तैसें सज्जनाचें चित्त ।।२।।
ज्यासि आपंगिता नाहीं । त्यासि धरी जो हृदयीं ।।३।।
दया करणें जें पुत्रासी । ते चि दासा आणि दासी ।।४।।
तुका म्हणे सांगूं किती? । तो चि भगवंताची मूर्ती ।।५
जगातल्या अनेक तंत्त्ववेत्यांनी ‘देवा’च्या अनेक व्याख्या केलेल्या आहेत. पण तुकोबांनी केलेली ईश्वराची व्याख्या या सर्वांमध्ये प्रथम क्रमांकावर असल्याचं माझं मत आहे. कारण, ईश्वर कुठं आहे? कसा आहे? हे सांगणं सोपं आहे. पण ईश्वर म्हणजे काय? हे सांगणं नक्कीच सोपं नाही. पण तुकोबांनी ते सांगितलं. विशेष म्हणजे सोपं करून सांगितलं. आणि त्यातही ईश्वर आणि साधू हे वेगळे नसून एकच असल्याचं त्यांचं प्रमाण पाहून तर मन खूपच आश्चर्यात पडतं. ते म्हणतात,
“जे कुणी ‘सुखात रंगलेले’ म्हणजेच आनंदी आहेत आणि जे कुणी ‘दुःखानं गांजलेले’ म्हणजेच खूप कष्टी आहेत, त्या सर्वांनाच जो ‘आपले’ असं म्हणतो, (आनंदाच्या वेळी आणि दुःखाच्याही वेळी तो ‘सोबत’ असतो) तोच खरा ‘साधू’ हे ओळखून घेतलं पाहिजे आणि ‘देव’ही अशा साधूंमध्येच असतो, हेही माहित करून घेतलं पाहिजे.”
“या अशा स्वतःत देव असलेल्या साधुचं मन (सामान्य लोकांप्रमाणं आतून काळं आणि वरून गोरं, असं राहत नाही. ते) लोणी जसं आतून मऊ तसंच बाहेरूनही मऊच असतं, (ते बाहेरून मऊ आणि आतून खडबडीत नसतं.) त्याप्रमाणं आतून आणि बाहेरूनही कळवळ्याचंच असतं.”
“जे निराधार, अनाथ असतात. ज्यांना संभाळनारं कोणी नसतं. अशांना जो आपल्या ‘हृदयाशी’ धरतो.” त्यांना प्रेम देतो, जिव्हाळा लावतो. तोच खरा साधू आहे.
हे तुकोबारायांना आपल्याला परत-परत सांगायचं आहे. म्हणून ते म्हणतात, “असा माणूस म्हणजेच प्रत्यक्ष भगवंताची मूर्ती आहे, हे मी तुम्हाला किती वेळेस सांगू?”
तुकोबांनी खूप वेळेस सांगण्याची गरज नाही. त्यांनी एकदा सांगितलं तरी ते आपल्याला प्रमाण आहे.
त्यांनी प्रमाणात सांगितल्याप्रमाणं, जो असा वागतो तोच साधू आणि ईश्वराचं वास्तव्य सुद्धा अशा साधुपुरुषाच्या मधेच आहे.
आपल्याला आज असा ईश्वराचं वास्तव्य असलेले साधू म्हणून जर कुणाला पाहायचं असेल, तर पाहिलं नाव डोळ्यांसमोर येतं ते ‘कर्मयोगी डेबूजी झिंगराजी जानोरकर’ उर्फ ‘राष्ट्रसंत गाडगेबाबा’ यांचं.
जय हरी……….
पंढरीत आषाढी यात्रेनिमित्त भरणार “कृषी पंढरी” कृषी महोत्सव-2018 “भव्य कृषी प्रदर्शन” बघा (जाहिरात

महाराष्ट्रातील नंबर वन!
ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 26 लाखाच्याही पुढे गेलेली आहे. 50 लाख वाचकांच्या टप्प्याकडे पंढरपूर लाईव्ह झेपावत आहे!
कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
उपसंपादक – विजयकुमार गायकवाड
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368, 8149624977
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368, 8149624977
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com