👁 5 Views

60 वर्षाची मामी भाच्याच्या प्रेमात झाली वेडी , आधी लग्न मोडलं आणि मग….

 

प्रेमाला काही वयाचं बंधन नसतं, हे आपण नेहमीच ऐकत असतो. त्यामुळे प्रेम प्रकरणाच्या अशा अशा घटना समोर येतात ज्यावर विश्वास बसत नाही. अशीच एक घटना उत्‍तर प्रदेशच्या शाहजहांपुरमधून समोर आली आहे.


इथे राहणारी एक 60 वर्षीय महिला तिच्या 42 वर्षीय भाच्याच्या प्रेमात पडली. ती त्याच्यासोबत लग्न करण्यासाठी अडून बसली होती आणि त्यानंतर दोघांच्याही लग्नाचा निकाहनामा तयार करण्यात आला. मामी फेक निकाहानामा तयार करून भाच्याच्या सासरी पाठवला. ज्यामुळे त्याचं लग्न मोडलं. याप्रकरणी वाद झाल्यावर मामीसहीत पाच लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला.


येथील भाच्याचा आरोप आहे की, मामीने त्याच्या होणाऱ्या सासऱ्याला फेक निकाहनामा पाठवला. ज्यामुळे त्याचं ठरलेलं लग्न मोडलं. महिलेचे मुलंही तिचीच साथ देत आहेत. महिलेने तिच्या नातेवाईकांसोबत घरात घुसून तोडफोड केली. भाच्याने पोलिसात याबाबत तक्रार दिली की, त्याच्या मामाचं निधन मार्च 2022 मध्ये संशयास्पद स्थितीत झाला होता.

मामाची मुलं तरूण आहेत. भाच्याचं कपड्याचं दुकान आहे. त्याच्या संपत्तीवर मामीला कब्जा करायचा आहे. भाच्यानुसार, मामी त्याच्यावर लग्नासाठी दबाव टाकत होती. पण भाच्याने नात्याचा हवाला देत लग्नास नकार दिला. त्यानंतर महिलेने सीमा पार केली. तिने भाच्याच्या घरावर हल्ला केला. भाच्याचा आरोप आहे की, 16 डिसेंबरला सायंकाळी 7 वाजता मामी तिची दोन मुले, सूना आणि काही लोक आले. त्यांनी घरात तोडफोड केली.


पीडित पक्षाचे वकिल उपमा भटनागर यांनी सांगितलं की, पीडित तरूणाने मामीच्या वागण्याला कंटाळून पोलिसात तक्रार दाखल केली आहे. तरूणाने सांगितलं की, 28 डिसेंबरला त्याची वरात निघणार होती. पण त्याच्या पाच दिवसाआधी सासरच्या पत्त्यावर मामीने फेक निकाहनामा पाठवला. ज्यामुळे त्याचं लग्न मोडलं. पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *