👁 8 Views

विठ्ठलाच्या महापुजेला पंढरीत जाणार नाही… घरीच विठ्ठलाची पुजा करणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पंढरपूर LIVE 22 July 2018

विठ्ठलाच्या महापुजेला पंढरीत जाणार नाही… घरीच विठ्ठलाची पुजा करणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 
भाविकांच्या सुरक्षेच्या कारणावरून मी पंढरीत विठ्ठलाच्या महापुजेला जाणार नाही. मी माझ्या घरातही विठ्ठलाची पुजा करू शकतो. अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. 
मंगळवेढ्यात जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मराठा व धनगर समाजाच्या भावनांचा विचार करून महापुजेला पंढरीत येणार नसल्याचे स्पष्ट केले होते. यानंतर खुद्द मुख्यमंत्र्यांनीही याला दुजोरा देत मी पंढरीत महापुजेला जाणार नसल्याचं जाहीर केलंय.
 मला झेड सुरक्षा आहे. मला कोणी हातही लावु शकत नाहीत. मी ठरवलं तर महापुजेपासुन मला कोणीही रोखु शकत नाही परंतु पंढरीत आलेल्या 10 लाख वारकरी भाविकांच्या सुरक्षेचा विचार करून मी पंढरीला महापुजेसाठी जाणार नाही. असे मत मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केलंय.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आधीच असा सामंजसपणा दाखवला असता तर आंदोलनकर्ते व प्रशासनातील वाद न वाढता सुसंवाद झाला असता. अशी प्रतिक्रिया आंदोलकांमधून उमटत आहे.
पंढरीत आषाढी यात्रेनिमित्त भरणार “कृषी पंढरी” कृषी महोत्सव-2018 “भव्य कृषी प्रदर्शन” बघा (जाहिरात

  


महाराष्ट्रातील नंबर वन! 

ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!! 

गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 26 लाखाच्याही पुढे गेलेली आहे. 50 लाख वाचकांच्या टप्प्याकडे पंढरपूर लाईव्ह झेपावत आहे!

कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

उपसंपादक – विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 

Mobile- 7972287368, 8149624977

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web – http://www.pandharpurlive.com

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *