👁 8 Views

‘हॅम रेडिओ’ आपत्कालीन परिस्थितीत ‘देवदुताचं’ कार्य करणारी बिनतारी संदेश यंत्रणा पंढरीत कार्यरत

पंढरपूर LIVE 22 July 2018


‘हॅम रेडिओ’ अर्थात बिनतारी संदेश यंत्रणेचा अत्याधुनिक विभाग पंढरीच्या प्रांताधिकारी कार्यालय परिसरात आषाढी यात्रेच्या पार्श्‍वभुमीवर कार्यान्वीत झालाय. जेंव्हा संपुर्ण मोबाईल नेटवर्क यंत्रणा कोलमडून गेलेली असते. एखाद्या  ठिकाणी अनुचित प्रकार घडलेला असताना संपर्काची सगळी आधुनिक साधने निरुपयोगी ठरतात तेंव्हा ‘हॅम रेडिओ’ ही बिनतारी संदेश यंत्रणा ‘देवदुताचं’ कार्य करते. अनेक वायरलेसवर एकाचवेळी संभाषण करणेसाठी प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी, स्वयंसेवक संघटना यांच्यामध्ये समन्वय ठेवण्यासाठी अतिशय प्रभावी कार्य करणारी ‘हॅम रेडिओ’ ची टीम आपल्या पंढरीतील प्रांताधिकारी कार्यालयात कार्य करत आहे. गेल्या 4 वर्षापासून ही टीम पंढरीत आषाढी वारी काळात सेवा बजावतेय. ‘हॅम रेडीओ’ च्या या हौसी वायरलेस तंत्रज्ञांनी आंबोली, विशाळगड आदी ठिकाणी अपघातातील अनेकांचे प्राण वाचविणे, पश्‍चिम किनारपट्टीवरील फयान वादळ, त्सुनामी वादळ या ठिकाणी तसेच मंत्रालयाला लागलेल्या आगीच्या प्रसंगी आपल्या या आधुनिक संदेश वहनाच्या माध्यमातून अनेकांचे प्राण वाचविण्याचे मौलिक कार्य केलेले आहे. अशी ही टीम आपल्या पंढरीत  अहोरात्र प्रामाणिकपणे सेवा बजावतेय. याबाबत पनवेल येथील हौशी वायरलेस ऑपरेटर सुरेश रिसबुड व कोल्हापूर येथील हौशी हॅम वायरलेस तंत्रज्ञ नितीन ऐनापूरे यांनी पंढरपूर लाईव्हशी बोलताना अधिक माहिती दिली.  
पंढरीत आषाढी यात्रेनिमित्त भरणार “कृषी पंढरी” कृषी महोत्सव-2018 “भव्य कृषी प्रदर्शन” बघा (जाहिरात

  


महाराष्ट्रातील नंबर वन! 

ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!! 

गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 26 लाखाच्याही पुढे गेलेली आहे. 50 लाख वाचकांच्या टप्प्याकडे पंढरपूर लाईव्ह झेपावत आहे!

कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

उपसंपादक – विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 

Mobile- 7972287368, 8149624977

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web – http://www.pandharpurlive.com

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *