👁 12 Views

आषाढी एकादशी विशेष: केशरचनेत साकारले सावळ्या विठुरायाचं स्वयंभु रुप

आषाढी यात्रेसाठी भुवैकुंठ पंढरी नगरीत आलेल्या सर्व वारकरी भाविकांचे पंढरपूर Live च्या वतीने हार्दिक स्वागत..!

पंढरपूर LIVE 23 July 2018

पंढरपूर (प्रतिनिधी):- खरं तर अवघ्या चराचरात सखा पांडुरंग व्यापलेला असतो. परंतु गोजिरं सावळं मनोहर रुप घेऊन एका विटेवर गेल्या अनेक युगापासून तो श्रीविठ्ठल भुवैकुंठ पंढरीत उभा आहे. आज आषाढी यात्रेच्या अनुपम्य सोहळ्या निमित्त विठ्ठलाचं हे लोभसवाणं रुप याची देही। याची डोळा पहाण्यासाठी 10 लाखांहून अधिक भाविक भुवैकुंठ पंढरी नगरीत दाखल झालेले आहेत. याचंच औचित्य साधुन पंढरीतील सुप्रसिध्द सलुन कलाकार माऊली चव्हाण यांनी मोठ्या कल्पकतेने सावळ्या विठुरायाचं स्वयंभु गोजिरं रुप केसरचनेत साकारलंय. चराचरामध्ये व्यापलेला भगवंत प्रत्येकाच्या मनामनातही घर करुन बसावा हे संतवचन सर्वांनाच ज्ञात असेल याचाच आधार घेऊन माऊली चव्हाण यांनी या परब्रम्हाचं सावळं रुप; मनात साठवून त्याचं हुबेहुब सावळं रुप मोठ्या कलात्मकतेने एका व्यक्तीच्या डोक्यावरील केससंभारात कोरलं आहे.
याबाबत बोलताना माऊली चव्हाण सांगतात, ‘‘गेल्या अनेक वर्षापासून मी सलुनचा व्यवसाय करतोय. सिनेमा व मालिका वगैरे मधील सेलिब्रेटींच्या चित्रविचीत्र केसरचने सारखी आमची केसरचना करा अशी मागणी करणारे  गिर्‍हाईक आमच्याकडे येत असतात. परंतु वेडेवाकडे विचित्र केसरचनेचे प्रकार करण्यापेक्षा ज्याद्वारे सामाजिक संदेश देता येईल व आपण इतरांपेक्षा कांही तरी करतोय असं समाधान मनाला वाटेल अशी केसरचना करण्याकडे माझा कल असतो. आज आषाढी यात्रेच्या पावन दिनी मी माझ्या सलुनमध्ये आलेले कृष्णा काळे यांना माझ्या मनातील श्रीविठ्ठलाच्या स्वयंभु सावळ्या मुर्तीची संकल्पना बोलुन दाखविली व त्यांनीही माझ्या मताला होकार देऊन आपल्या डोक्यावर ही गोजिरी सावळी मुर्ती कोरुन घेतली. हे काम करण्यासाठी बराच वेळ गेला परंतु सर्व काम संपल्यावर जेंव्हा विठोबाचं साजिरं रुपडं दिसलं तेंव्हा प्रत्यक्ष विठ्ठलच माझ्या समोर दर्शनासाठी उभा असल्याचा साक्षात्कार झाला. मी धन्य झालो. असे मत माऊली चव्हाण यांनी एका प्रसिध्दीपत्रकाद्वारे  व्यक्त केलंय.
आजच्या धकाधकीच्या दुनियेत अनेक कालाकार जन्माला येतात. असे अनेक कलाकार आपापल्या क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी बजावतात. आपल्या कलेच्या माध्यमातून ते समाजहितासाठीचे अनेक संदेश देण्याचा प्रयत्नही करत असतात. कलाकार माऊली चव्हाण यांनीही आपल्या कलेद्वारे पक्षीसंवर्धनाचा एक सामाजिक संदेश देण्याचे स्तुत्य कार्य केले आहे. माऊली चव्हाण यांचे लई भारी फे्रेंडशीप जेन्टस् पार्लर हे केशकर्तनालयाचे दुकान पंढरीतील दाळे गल्ली येथे आहे. आपल्या हातातील कैची वस्तर्‍याच्या द्वारे  त्यांनी कलेचे अनेक उत्कृष्ट नमुने याआधीही दाखवुन दिले आहेत. आपल्याकडे येणार्‍या ग्राहकांच्या केसांमध्ये विविध प्रकारची चित्रे, व्यक्तिगत चित्रे, चिन्हे वगैरे ते रेखीव पध्दतीने कोरत असतात. 

त्यांच्या या कलेद्वारे सादर केलेल्या स्तुत्य उपक्रमाचे पंढरपूर शहर व तालुक्यातून सर्वत्र कौतुक होताना दिसून येत आहे. अनेक राजकीय नेते, सामाजिक कार्यकर्ते व प्र तिभावंत व्यक्तींनी माऊली चव्हाण यांची प्रत्यक्ष भेट घेऊन व दुरध्वनीद्वारे कौतुक करुन त्यांच्या कलेला दाद दिली आहे. त्यांच्या या कलेच्या उत्कर्षासाठी व त्यांना प्रेरीत करण्यासाठी सकल नाभिक समाज संघटनेच्या वतीने प्रयत्न केले जात आहेत.
पंढरीत आषाढी यात्रेनिमित्त भरणार “कृषी पंढरी” कृषी महोत्सव-2018 “भव्य कृषी प्रदर्शन” बघा (जाहिरात

  


महाराष्ट्रातील नंबर वन! 

ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!! 

गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 26 लाखाच्याही पुढे गेलेली आहे. 50 लाख वाचकांच्या टप्प्याकडे पंढरपूर लाईव्ह झेपावत आहे!

कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

उपसंपादक – विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 

Mobile- 7972287368, 8149624977

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web – http://www.pandharpurlive.com

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *