👁 9 Views

पंढरपूर सिंहगड इन्स्टिट्युटमध्ये विश्वास नांगरे-पाटील व कृष्णप्रकाश यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

आषाढी यात्रेसाठी भुवैकुंठ पंढरी नगरीत आलेल्या सर्व वारकरी भाविकांचे पंढरपूर Live च्या वतीने हार्दिक स्वागत..!

पंढरपूर LIVE 24 July 2018

पंढरपुर (प्रतिनिधी) एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंनिनिअरिंग पंढरपुर महाविद्यालयात सोमवार २३ जुलै रोजी व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली होती. या व्याख्यानमालेचे उदघाटन कोल्हापूर परिक्षेञाचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील तसेच मुंबई परीक्षेञाचे विशेष पोलीस महानिरीक्षक कृष्ण प्रकाशपंढरपुर सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडेसोमनाथ नवले आदी मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पुजन व दिपप्रज्वलन करून करण्यात आले.
  यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना कोल्हापूर परिक्षेञाचे विशेष पोलीस महानिरीक्षकविश्वास नांगरे-पाटील म्हणालेमोबाईल मधून सेल्फी काढून फेसबुक वर टाकला तर त्या फोटोला चार-दोन लाईक्स मिळतील बाकी काही नाही. जीवनाचा प्रवास करीत असताना स्वप्नांच्या पाठीमागे लागा समाजात तुमचे अस्तित्व महत्वाचे आहे. आयुष्य एकदाच मिळते ते कसे जगायचे हे तुम्ही ठरवा. स्वतःच्या पायावर उभे राहायला शिकले पाहिजे. ध्येय डोळ्यासमोर ठेऊन तुम्ही त्याच्या पुर्तीसाठी पछाडले पाहिजे. कितीही मोठं संकट येऊ द्या त्या संकटाना ठणकावून सांगा मी सज्ज आहे लढण्यासाठी. या वयातच तुम्ही चांगल्या सवयी लावल्या पाहिजेत. शरीराची काळजी घेत असताना दररोज व्यायाम आवश्यक असुन किमान रोज बारा सुर्यनमस्कार जरी केले तर आयुष्यात तुम्हाला पाटीचा व पोटाचा आजार होणार नाही. आयुष्यात कधी मोठं व्हायचंकधी छोटं व्हायचं हे आपण ठरवू शकतो त्यासाठी प्रयत्न व जिद्द असली पाहिजे. छोट्या छोट्या गोष्टीवरून आईवडिलांना दु:खी करू नका. जीवनात वाट्याला आलेले काम करीत असताना स्वतःवरती विश्वास ठेवून काम केल्यास तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल. विद्यार्थी जीवनात अभ्यासाची मेहनत घेत असताना करिअर ची दिशा ठरवा यश तुमचेच आहे. असे मत आयजी विश्वास नांगरे-पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना व्यक्त केले.
        मुंबई परिक्षेञाचे पोलीस महानिरीक्षक कृष्ण प्रकाश विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले, जीवनात ज्या गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत त्या गोष्टी टाकरगेट करा. तुम्ही जय तुमच्या ध्येयावर ठाम असाल तर यश निश्चित मिळते. प्रत्येक माणसाच्या आयुष्यात महत्वाचे क्षण येत असतात.अशावेळी जीवनाचा अर्थ समजुन घेऊन आयुष्य जगले पाहिजे. जीवनात यश प्राप्तीषाठी सतत प्रयत्न करीत असताना आपल्या ध्येयाकडे सकारात्मक दृष्टीकोनातून पाहिले पाहिजे. जे ध्येय तुम्ही ठरविले आहे त्या ध्येयावर तुमचा पुर्ण विश्वास असला पाहिजे. स्वतःसाठी तुम्ही अमुल्य आहात याची जाणीव तुम्हाला असली पाहिजे. जीवन जगत असताना तुम्हाला काय करायचे आहे आणि कशासाठी करायचे आहे त्यांचा दृष्टीकोन करिअरचा दृष्टीकोन ठेऊनच आयुष्याचे नियोजन करा तेच तुम्हाला पुढे घेऊन जाईल. तुम्ही कसे दिसता या पेक्षा तुम्ही कसे बोलताराहता हे महत्त्वाचे असुन तुम्ही ज्यांच्या संगतीत आपण राहतो तसेच आपण घडत असतो. जे करायचे आहे त्या गोष्टीचा परीक्षेच्या अगोदर जास्तीत जास्त सराव केला पाहिजे. हे सर्व करीत असताना नकारात्मक विचार बाजूला ठेवले पाहिजेत. जिद्द चिकाटीच्या माध्यमातून तुम्ही तुमचे ध्येय गाठू शकता. हातावरील रेषाचे भविष्य बघण्यापेक्षा त्याच हाताने मेहनत घ्या तुमच्या आयुष्यात नक्कीच यश मिळेल असे मत पोलीस महानिरीक्षक कृष्ण प्रकाश यांनी पंढरपुर सिंहगड मधील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना व्यक्त केले.
 या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना विश्वास नांगरे-पाटील व कृष्ण प्रकाश यांनी उत्तरे दिली. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचा-यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सुञसंचालन पारिजात नवाळे यांनी केले तर उपस्थितांचे आभार महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी मानले.
फोटो ओळी:- पंढरपूर सिंहगड इन्स्टिट्युटमध्ये आयोजित केलेल्या व्याख्यानमालिकेचे दीपप्रज्वलन करून उद्घाटन करताना कोल्हापूर परिक्षेञाचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटीलमुंबई परीक्षेञाचे विशेष पोलीस महानिरीक्षक कृष्ण प्रकाशपंढरपुर सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडेसोमनाथ नवले आदी तर दुसऱ्या छाया चित्रात उपस्थित विद्यार्थी.

पंढरीत आषाढी यात्रेनिमित्त भरणार “कृषी पंढरी” कृषी महोत्सव-2018 “भव्य कृषी प्रदर्शन” बघा (जाहिरात

  


महाराष्ट्रातील नंबर वन! 

ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!! 

गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 26 लाखाच्याही पुढे गेलेली आहे. 50 लाख वाचकांच्या टप्प्याकडे पंढरपूर लाईव्ह झेपावत आहे!

कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

उपसंपादक – विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 

Mobile- 7972287368, 8149624977

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web – http://www.pandharpurlive.com

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *