👁 8 Views

ऑगस्ट ते 8 ऑगस्ट सकल मराठा समाजाचे तहसिल कार्यालय पंढरपूर येथे ठिय्या आंदोलन तर 9 ऑगस्ट रोजी चक्का जाम

आषाढी यात्रेसाठी भुवैकुंठ पंढरी नगरीत आलेल्या सर्व वारकरी भाविकांचे पंढरपूर Live च्या वतीने हार्दिक स्वागत..!

पंढरपूर LIVE 27 July 2018

सकल मराठा समाज व मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने मराठा आरक्षणाच्या मागणीसंदर्भात दि. 2 ऑगस्ट 2018 पासून 8 ऑगस्ट पर्यंत पंढरपूर येथील तहसलि कार्यालयात ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे. तसेच 9 ऑगस्ट क्रांती दिनाच्या दिवशी चक्का जाम आंदोलन करण्यात येणार असल्याचा निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आला. या अंदोलनात पंढरपूर तालुक्यातील सर्व गावातील समाजबांधव सहभागी मोठ्या संख्येने होणार आहेत.

आज इसबावी, पंढरपूर येथील श्रीराम मंगल कार्यालयात आ. भारतनाना भालके यांच्या समर्थनार्थ सकल मराठा, धनगर समाज, महादेव कोळी समाज, मुस्लिम समाज व बहुजन समाज तसेच हितचिंतकांचा मेळावा संपन्न झाला. या मेळाव्यात आ. भालके यांनी दिलेला राजीनामा परत घ्यावा. अशी मागणी कार्यकर्त्यांकडून करण्यात आली. यावेळी आ. भारतनाना भालके, चेअरमन कल्याणराव काळे, मंगळवेढा नगरपालिकेच्या नगराध्यक्षा आरुणा माळी यांनी आपले मत व्यक्त केले. याचबरोबर रामभाऊ गायकवाड, मोहन कोळेकर, समाधान फाटे, शालिवाहन कोळेकर, बाबा अधटराव, अरुणभाऊ कोळी, धनंजय कोताळकर, महादेव भालेराव, महादेव धोत्रे, महंमद उस्ताद, बजरंग बागल, लतीफ तांबोळी, पोपट पडोळे, संदीप पाटील, बशीर तांबोळी, अजित जगताप, रामभाऊ वाकडे, मारुती वाकडे, संदीप मांडवे, विश्रांती भुसनर, तानाजी खरात आदींसह अनेक मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी किरणराज घाडगे यांनी प्रास्ताविक केले.    
पंढरीत आषाढी यात्रेनिमित्त भरणार “कृषी पंढरी” कृषी महोत्सव-2018 “भव्य कृषी प्रदर्शन” बघा (जाहिरात

  


महाराष्ट्रातील नंबर वन! 

ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!! 

गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 26 लाखाच्याही पुढे गेलेली आहे. 50 लाख वाचकांच्या टप्प्याकडे पंढरपूर लाईव्ह झेपावत आहे!

कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

उपसंपादक – विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 

Mobile- 7972287368, 8149624977

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web – http://www.pandharpurlive.com

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *