👁 8 Views

रस्ता चुकल्याने कंटेनर चालकाच्या डोक्यात लोखंडी रॉडने वार

 शहजाद अब्दुल कयूम अहमद (वय 26, रा. पोखर भिटवा, उत्तर प्रदेश) असे खून झालेल्या चालकाचे नाव आहे. याप्रकरणी त्याचा सहकारी समसुल अली अहमद खान (उत्तरप्रदेश) त्याच्या विरोधात लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


याप्रकरणी अधिक माहिती अशी की, फिर्यादीच्या मालकीचा कंटेनर मयत चालवत होता. तर आरोपी त्याचा सहकारी होता. 26 जानेवारी रोजी वडू बुद्रुक गावाच्या हद्दीत कंटेनर चा रस्ता


 चुकल्याच्या कारणावरून दोघांमध्ये वाद झाले. त्यानंतर आरोपीने लोखंडी रॉडने शहजाद याच्या डोक्यात मारहाण केली. वर्मी घाव बसल्याने शहजाद याचा जागीच मृत्यू झाला.


त्यानंतर त्याचा मृतदेह कंटेनरच्या केबिनमध्ये ठेवून आरोपी पळून गेला आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू  आहे. संजय रामफळ कालीरामना (वय 41, गुजरात) यांनी याप्रकरणी तक्रार दिली आहे.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *