👁 8 Views

9 ऑगस्टपासून मराठा समाजाचे राज्यव्यापी आंदोलन, आता शासनासोबत चर्चा नाहीच.

पंढरपूर LIVE 29 July 2018

वर्षभरापूर्वी मुंबईतील मोर्चामध्ये २० मागण्यांचे निवेदन राज्य शासनाला दिले होते. त्यावर सरकारने कसलीच हालचाल केली नाही. आता आंदोलन तीव्र झाल्यानंतर सरकार चर्चेच्या बाता करीत आहे. परंतु, आता चर्चा नाही, निर्णय घ्या अन्यथा ९ आॅगस्ट पासून राज्यभर जनांदोलन उभे राहील. ज्याद्वारे उद्रेक उद्भवला तर त्याला शासन जबाबदार राहील, असा इशारा मराठा क्रांती मोर्चाच्या २२ जिल्ह्यांतील समन्वयकांनी राज्य बैठकीत दिला आहे. लातूर येथील राहिचंद्र सभागृहात आयोजित राज्य बैठकीत९ ठराव घेण्यात आले. चर्चेअंती पत्रपरिषदेत बोलताना समन्वयक म्हणाले, ९ आॅगस्ट २०१७ रोजी मुंबईतील मोर्चात केलेल्या मागण्यांवर निर्णय घ्यावा. तसेच गेल्या काही दिवसांत उभारलेल्या आंदोलनातील सर्व गुन्हे बिनशर्त मागे घ्यावेत, या मागण्यांसाठी ९ आॅगस्ट रोजी क्रांती दिनी मराठा क्रांती जनांदोलनाची हाक देण्यात येत आहे. आता शासनाशी कोणीही चर्चा करणारनाही. तसेच कोणीही मध्यस्थी वा चर्चेला जाऊ नये, असा ठरावही राज्य बैठकीत झाला आहे. १ आॅगस्टपासून प्रत्येक मराठा आमदार व खासदारांच्या निवासस्थानासमोर ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे. दरम्यान, आंदोलनातील शहिदांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत म्हणून ५० लाख व कुटुंबातील सदस्यास शासकीय नोकरीत सामावून घ्यावे, असा ठराव केल्याचे सांगत समन्वयक म्हणाले, काकासाहेब शिंदे, तोडकर व सोनवणे यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या अधिकाºयांची एसआयटी मार्फत चौकशी करुन गुन्हे दाखल करावेत.मराठा आरक्षणासाठी विधि मंडळाचे तात्काळ अधिवेशन बोलवावे. तर मागण्या मान्य होईपर्यंत मराठा क्रांती मोर्चा राज्य सरकारसोबत असहकार आंदोलन करेल. शेवटी राज्यस्तरीय मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांची पुढील बैठक परभणी येथे होईल, असा निर्णयही बैठकीत झाला आहे. शासनाचे धोरणात्मक निर्णय फसवे.
मुंबईतील मोर्चावेळी शासनाने काही धोरणात्मक निर्णय जाहीर केले. ज्यामध्ये जिल्हास्तरावर वसतिगृह, राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती या निर्णयांचा समावेश होता. परंतु, या संदर्भात कोणत्याही जिल्ह्यात अंमलबजावणी झाली नाही. साधे परिपत्रक निघाले नाही. आंदोलन मराठा क्रांती मोर्चाने केले आणि निर्णय आर्थिक दुर्बल घटकांतील सर्वांसाठी राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्तीचा केला. त्यालाही आमचा विरोध नाही. परंतु, मराठा समाजाच्या मागण्यांचे काय? असा सवाल समन्वयकांनी केला. 
९ आॅगस्टला मराठा क्रांतीची ताकद दिसेल… 
१ ते ८ आॅगस्ट शासनाला असहकार, मराठा आमदार-खासदारांच्या घरांसमोर ठिय्या आंदोलन होईल. त्यानंतर९ आॅगस्ट रोजी मराठा क्रांतीची ताकद दिसेल. राज्यभर एक संघपणे आंदोलन लढले जाईल. शासकीय कार्यालयांसह शाळा-महाविद्यालये शांततेने बंद केली जातील. मराठा समाज शांततेनेच आंदोलन करीत आहे. परंतु, समोरून उलटसुलट विधाने झाली आणि उद्रेक झाला तर त्याला शासन जबाबदार असेल.
  


महाराष्ट्रातील नंबर वन! 

ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!! 

गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 26 लाखाच्याही पुढे गेलेली आहे. 50 लाख वाचकांच्या टप्प्याकडे पंढरपूर लाईव्ह झेपावत आहे!

कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

उपसंपादक – विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 

Mobile- 7972287368, 8149624977

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web – http://www.pandharpurlive.com

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *