👁 9 Views

पंढरीत नगरपरिषदेच्या पिण्याच्या पाण्याची चव का बदलली..? नागरिकांनी कोणती काळजी घ्यावी? आणखी किती दिवस पंढरपूरकरांना प्यावे लागेल बेचव पाणी?

पंढरपूर LIVE 3 आॅगस्ट  2018

अवश्य बघा पंढरपूर लाईव्हचा स्पेशल व्हिडीओ रिपोर्ट..!

गेल्या 29 जुलै पासुन पंढरपूर शहरात पुरवठा केल्या जाणार्‍या पंढरपूर नगरपरिषदेच्या पिण्याच्या पाण्याला एक वेगळ्याच प्रकारची चव येत असून हे पाणी बेचव लागत आहे. पाण्याची चव बदलल्यामुळे हे पाणी तोंडात सुध्दा घ्यावेसे वाटत नाही. कित्येक दिवस झाले तरी पाण्याची चव बदलत नाही त्यामुळे हे पाणी दुषीत तर नाही ना? नगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे याकडे दुर्लक्ष तर नाही ना? या ना अनेक तक्रारी नागरिकांमधून ऐकावयास मिळत होत्या. पंढरपूर लाईव्हने याचा छडा लावण्याचा प्रयत्न केला.  लिंकरोडवरील पंढरपूर नगरपरिषदेच्या जलशुध्दीकरण केंद्राची पहाणी करुन पाणीपुरवठा विभागाचे कनिष्ठ अभियंता संदेश मोरे व पंढरपूर नगरपरिषदेचे उपमुख्याधिकारी सुनील वाळुजकर यांच्याशी पंढरपूर लाईव्हनं संवाद साधला. नगरपरिषदेच्या जलशुध्दीकरण केंद्रामध्ये पाण्यावर प्रक्रिया करुनही पाण्याची चव बदलत नाही. याबाबत महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाचे उपविभागीय अधिकारी यांना कळविले आहे. अशी माहिती पंढरपूर लाईव्हशी बोलताना त्यांनी दिली. बघा पंढरपूर लाईव्हचा हा व्हिडीओ रिपोर्ट.  

  


महाराष्ट्रातील नंबर वन! 

ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!! 

गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 26 लाखाच्याही पुढे गेलेली आहे. 50 लाख वाचकांच्या टप्प्याकडे पंढरपूर लाईव्ह झेपावत आहे!

कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

उपसंपादक – विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 

Mobile- 7972287368, 8149624977

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web – http://www.pandharpurlive.com

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *