पंढरपूर LIVE 4 आॅगस्ट 2018
विद्यापीठाच्या निवडणुकीत विजयी उमेदवारांचे स्वेरीत सत्कार
पंढरपूर- ‘संघटनेचे कार्य करताना विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकतज्ञ हे ‘विद्यार्थी’ हाच केंद्र बिंदू मानून कार्य केले पाहिजे तरच त्या विद्यार्थ्यांबरोबरच विद्यापीठाचा व पर्यायाने देशाचा विकास होतो. विद्यापीठ मॅनेजमेंट समोर संघर्ष करतांना डॉ. रोंगे सरांच्या कार्याचे बऱ्याचदा ऐकले आहे, अनुभवले आहे. त्यांच्याकडे स्पष्टवक्तेपणा असून विद्यार्थ्यांचे हीत डोळ्यासमोर ठेवून ते कार्य करत असल्याचे दिसून येते म्हणूनच त्यांचा हा विजय दीर्घकाळ स्मरणात राहणार आहे. डॉ. रोंगे सरांमध्ये अभ्यासपूर्ण निर्णय घेण्याची क्षमता प्रचंड आहे. त्यामुळे भविष्यात विद्यार्थ्यांचा विकास अधिक वेगाने होईल आणि पर्यायाने देशाचा विकास देखील होत असल्याचे दिसू लागेल. एकूणच शिक्षण क्षेत्रातील जाणते व्यक्तिमत्व म्हणजेच प्राचार्य डॉ. बी.पी.रोंगे सर !’ असे गौरवोदगार आखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे पश्चिम क्षेत्र क्षेत्रीय संघटन मंत्री देवदत्त जोशी यांनी काढले.
गोपाळपूर येथील स्वेरीच्या मध्यवर्ती ओपन थिएटरमध्ये आयोजिलेल्या सोलापूर विद्यापीठातील व्यवस्थापन परिषदेच्या निवडणुकीत विजयी झालेल्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार सोहळ्याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून अभाविपचे क्षेत्रीय संघटन मंत्री जोशी बोलत होते. दिपप्रज्वलनानंतर संस्थेचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ. बी.पी.रोंगे यांनी कार्यक्रमाची रूपरेषा सांगून स्वेरीची संघर्षमय वाटचाल आणि त्यातून मिळालेले अदभूत यश सांगताना उपस्थितांच्या अंगावर शहारे आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्वेरीचे जेष्ठ विश्वस्त दादासाहेब रोंगे हे होते. यावेळी रेकॉर्डब्रेक मते मिळवून विजयी झालेल्या अश्विनी चव्हाण, अॅड. नीता मंकणी, प्रकाश त्र्यंबकराव, राज्यपाल नियुक्त सिनेट सदस्य अमोल कळके, कार्यकारी सदस्य महामंत्री राजेंद्र गायकवाड, महिला पदवीधर संघाचे पद्मावती नागणसुरे, शिवाजी शिक्षण मंडळाचे खजिनदार रेवडकर, सुरेश पाटील, संस्था प्रतिनिधी डॉ. बी.पी.रोंगे यांचा सत्कार करण्यात आला. सत्कारानंतर बोलताना नागणसुरे म्हणाल्या ‘सोलापूर विद्यापीठाला तब्बल १४ वर्षानंतर अभियांत्रिकीला नेतृत्व करण्याची संधी मिळाली असून डॉ. रोंगे सरांच्या रूपाने अभ्यासू नेतृत्व लाभले असून सोलापूर विद्यापीठाचा दर्जा आणखी सुधारेल अशी कामे यंदा होतील.’ अॅड. मंकणी म्हणाल्या ‘सांघीक सहकार्याचा हा विजय असला तरी आता विद्यापीठाच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वांच्या सहकार्याने, सर्वांना विश्वासात घेवून विद्यार्थ्यांचे अडलेली कामे मार्गी लावू’ अश्विनी चव्हाण म्हणाल्या ‘मुलांच्या प्रत्येक कार्याला आता न्याय मिळणार असून प्राचार्य डॉ. रोंगे सरांच्या दिशादर्शक नेतृत्वाखाली विकासाच्या आलेख उंचावू.’ पी.टी.पाटील म्हणाले,’ डॉ. रोंगे सरांनी देश घडविण्याची फॅक्टरी पहिल्यापासून उभी केली असून हा एक देशाकडे जाण्याचाच मार्ग आहे.आता ‘स्वेरी आणि विद्यापीठ’ हे दोघेही सांगड घालून विद्यार्थ्यांच्या विकासासाठी झेपावतील.’ पुढे बोलताना प्रमुख पाहुणे जोशी म्हणाले की, ‘तोच समस्या मांडू शकतो, जो विद्यार्थ्यांच्या वेदना जाणू शकतो आणि हेच कार्य विद्यार्थ्यांसाठी लढा, संघर्ष करणाऱ्या नेतृत्वाचे असते. विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक उर्जा आणणे हेच संघटनेचे कार्य आहे.’ असे सांगितले. अध्यक्षस्थानावरून बोलताना स्वेरीचे जेष्ठ विश्वस्त दादासाहेब रोंगे म्हणाले की,’ पावसाचा एकच थेंब विविध ठिकाणी पडल्यावर त्याचे महत्व कसे वाढते त्याप्रमाणे आपल्या कार्याचे महत्व वाढणारे असावे. यासाठी विद्यार्थ्यांना घडविण्यासाठी विविध प्रयोग केले पाहिजे. शिक्षण घेत असतानाचे ‘सामर्थ्य’ आणि शिक्षणानंतरचे ‘सामर्थ्य’ यात फरक पडला तर शिक्षणाचे महत्व आणखी वाढते.’ असे सांगून त्यांनी संत नामदेव महाराजांच्या शतकातील शिक्षणाचे महत्व विशद केले. यावेळी स्वेरीमध्ये अभाविपची शाखा स्थापन करण्यात आली असून त्यातील नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार देखील पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी अभाविपचे हरिदास बिले, भोसले गुरुजी, दामाजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एन.बी.पवार, स्वेरीचे माजी अध्यक्ष व विश्वस्त विजय शेलार, माजी अध्यक्ष व विश्वस्त धनंजय सालविठ्ठल, सांस्कृतिक कार्यक्रम विभागप्रमुख प्रा. करण पाटील, स्वेरी संचलित इतर तिन्ही महाविद्यालयाचे प्राचार्य, उपप्राचार्य, अधिष्ठाता, विभागप्रमुख, प्राध्यापकवर्ग, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते. प्रा.यशपाल खेडकर यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.

महाराष्ट्रातील नंबर वन!
ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 26 लाखाच्याही पुढे गेलेली आहे. 50 लाख वाचकांच्या टप्प्याकडे पंढरपूर लाईव्ह झेपावत आहे!
कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
उपसंपादक – विजयकुमार गायकवाड
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368, 8149624977
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368, 8149624977
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com