👁 9 Views

सिंहगडच्या मेकॅनिकल इंजिनिअरींग मध्ये “स्टुडंट चापटर” सुरू

पंढरपूर LIVE 6 ऑक्टोबर 2018


      पंढरपूर (प्रतिनिधी) कोर्टी (ता. पंढरपूर) येथील एस के एन सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयातील मेकॅनिकल इंजिनिअरींग विभागामध्ये “द इंस्टिट्युशन ऑफ इंजिनिअर्स (इंडिया आय.ई. आय.) या संस्थेच्या मार्गदर्शनाखाली “स्टुडंट चापटर” सुरू करण्यात आली असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.
     महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या “स्टुडंट चापटर” या कार्यक्रमाचे उदघाटन मेकॅनिकल इंजिनिअरींग विभाग प्रमुख डॉ. रविंद्र व्यवहारे, आय.ई.आय.लोकल सेंटर सोलापूर चे सेक्रेटरी प्रा. एस. एम. शेख, अमोल देशमुख, समन्वयक प्रा. अनिल जाधव, विद्यार्थी प्रतिनिधी सिद्धेश्वर दळवे आदी मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पुजन व दीपप्रज्वलन करून करण्यात आले.





       यावेळी बोलताना प्रा. शेख म्हणाले, सध्याच्या युगात पेट्रोल, डिझेल ला पर्यायी इंधन शोधणे, अपारंपारिक ऊर्जा प्रकल्पावरती संशोधन काम करणे, वाढते प्रदुषण कमी करण्यासाठी संशोधन करणे ही काळाची नितांत गरज आहे. विद्यार्थ्यांनी आय. ई. आय. च्या माध्यमातून या संशोधन विभागात भरीव कामगिरी करण्याचे आव्हान प्रा. शेख यांनी केले.
     यादरम्यान मेकॅनिकल विभाग प्रमुख डॉ. रविंद्र व्यवहारे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मेकॅनिकल इंजिनिअरींग विभागातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचा-यांनी परीश्रम घेतले.  या कार्यक्रमाचे सुञसंचलन कुमार अथर्व देशमुख यांनी केले तर उपस्थितांचे आभार प्रा. अनिल जाधव यांनी मानले.

फोटो ओळी:- पंढरपूर सिंहगड मधील मेकॅनिकल इंजिनिअर विभागामध्ये आयोजित केलेल्या कार्यक्रमाचे उदघाटन करताना मान्यवर.

  


महाराष्ट्रातील नंबर वन! 

ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!! 

गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 35 लाखाच्याही पुढे गेलेली आहे. 50 लाख वाचकांच्या टप्प्याकडे पंढरपूर लाईव्ह झेपावत आहे!

कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

उपसंपादक – विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 

Mobile- 7972287368, 8149624977

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web – http://www.pandharpurlive.com

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *