👁 8 Views

कार्यशाळेमुळे बौद्धिक क्षमता वाढते -द इन्स्टिटयूट ऑफ इंजिनिअर्सचे सचिव प्रा. एस.एम. शेख

पंढरपूर LIVE 6 ऑक्टोबर 2018

स्वेरीमध्ये ‘द इन्स्टिटयूट ऑफ इंजिनिअर्स स्टुडंट चॅप्टर’चे उदघाटन
पंढरपूर- ‘अभियांत्रिकीचे शिक्षण घेताना अभ्यासासोबतच बऱ्याचशा गोष्टी विद्यार्थ्यांना करावयाची अत्यंत आवश्यकता असते. यामुळे अभ्यासक्रमाला वाव मिळून बौद्धिक क्षमता वाढीस लागते. शोध प्रबंध, प्रकल्प बनविण्यासाठी तसेच पेटंट करण्यासाठी अशा सदस्यत्वाचा प्रचंड प्रमाणात उपयोग होतो. यामुळे इतरांचे प्रकल्प आणि पेटंट याचाही अभ्यास होतो.’ असे प्रतिपादन द इन्स्टिटयूट ऑफ इंजिनिअर्स (सोलापूर विभाग) चे सचिव प्रा. एस.एम. शेख यांनी केले.
          येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अॅण्ड रिसर्च इन्स्टिटयूट,पंढरपूर संचलित डिप्लोमा इंजिनिअरींगच्या विद्यार्थ्यांसाठी ट्रेनिंग अॅण्ड प्लेसमेंट विभागाच्या सेमिनार हॉलमध्ये एकदिवशीय ‘द इन्स्टिटयूट ऑफ इंजिनिअर्स स्टुडंट चॅप्टर’चे उदघाटन झाले. यात प्रमुख मार्गदर्शक म्हणून द इन्स्टिटयूट ऑफ इंजिनिअर्सचे सचिव प्रा. शेख विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत होते. प्रारंभी डिप्लोमाचे प्राचार्य डॉ. एन.डी. मिसाळ यांनी विद्यार्थ्यांना आय.ई. आय.चे सदस्य का व्हावे? याविषयी माहिती दिली. तसेच त्यांनी डिप्लोमाच्या स्थापनेपासूनच्या प्रगतीचा लेखा-जोखा सादर करून २००८ पासून या विद्यार्थी आय.ई. आय. चे सदस्य होण्यासाठी इच्छुक असल्याचे सांगितले. पदवी अभियांत्रिकीसाठी प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी ब्रांचवाईज तर पदविका अर्थात डिप्लोमासाठी कॉलेजवाईज सभासद होता येते. सदस्यत्व प्राप्तीनंतर आपल्या प्रकल्पांना निधी मिळू शकते.’ असे सांगून आय.ई. आय. ची सविस्तर माहिती दिली. कोलकत्तामध्ये १९३५ साली अभियंत्यांसाठी असलेली ‘द इन्स्टिटयूट ऑफ इंजिनिअर्स’ संघटनेची स्थापना झाली तर सोलापूर येथे याचे लोकल सेंटर २२ ऑगस्ट २०१० साली सुरु झाले असून यंदाचे चेअरमन स्वेरीचेच संस्थापक सचिव व पदवी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी.पी. रोंगे आहेत. यावेळी डिप्लोमाच्या ३७२ विद्यार्थी व १६१ प्राध्यापकांनी आय.ई. आय.चे सदस्यत्व स्विकारले. यावेळी आय.ई.आय.चे प्रभारी प्रशासन अधिकारी अमोल देशमुख, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे जिल्हा संघटक हरिदास बेले, अभियांत्रिकीचे उपप्राचार्य प्रा. एस. एन. कुलकर्णी, प्रा. एस. व्ही. कुलकर्णी, सर्व विभागप्रमुख, प्राध्यापकवर्ग व डिप्लोमाच्या अंतिम वर्षातील जवळपास ४२० विद्यार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. रेश्मा देशमुख व प्रा. गीता खारे यांनी केले तर कार्यक्रमाचे समन्वयक प्रा. विशाल बंडगर यांनी आभार मानले.

  


महाराष्ट्रातील नंबर वन! 

ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!! 

गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 35 लाखाच्याही पुढे गेलेली आहे. 50 लाख वाचकांच्या टप्प्याकडे पंढरपूर लाईव्ह झेपावत आहे!

कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

उपसंपादक – विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 

Mobile- 7972287368, 8149624977

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web – http://www.pandharpurlive.com

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *