पंढरपूर LIVE 7 ऑक्टोबर 2018
*पंढरपूर सिंहगड अभियांत्रिकीच्या प्रथम वर्ष अभियांत्रिकी मध्ये पालक मेळावा संपन्न
पंढरपूर (प्रतिनिधी) आपल्या पाल्यांची महाविद्यालयातील शिक्षकांची जेवढी जबाबदारी आहे तेवढीच जबाबदारी पालक म्हणून आपली सुद्धा आहे. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकासासाठी पंढरपूर सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय सर्व सोई सुविधा मिळत असल्या तरी पालक म्हणून आपण आपल्या मुला-मुलींसाठी अधुन-मधुन महाविद्यालयात येऊन पाल्याच्या प्रगतीची चौकशी केली पाहिजे. मुलांचा लाड करा पण त्यांना त्यांचे महत्व पटवून दिले पाहिजेत. आपण आपल्या मुला-मुलींसाठी किती कष्ट घेतो यांची जाणीव पोरांना होऊ द्या जर त्यांना या गोष्टीची जाणीव झाली तर आपल्या कष्टांचे चीज आपला पाल्य निश्चित करेल. मुलगा महाविद्यालयात शिक्षणासाठी घातला म्हणजे पालकांचे काम संपले असे नाही तर त्यासाठी वेळ दिला पाहिजे. आपले नुकसान होते म्हणून आपण संपती मिळवत बसलो तर संतती वाया जाईल यासाठी आपण पालकांनी संपत्ती पेक्षा संततीला वेळ दिला पाहिजे असे मत पंढरपूर सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात आयोजित केलेल्या प्रथम वर्ष अभियांत्रिकी मधील पालक मेळाव्यात बोलताना डाॅ. साजिकराव पाटिल यांनी व्यक्त केले.
कोर्टी (ता. पंढरपूर) येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रथम वर्ष अभियांत्रिकी मध्ये आयोजित करण्यात आलेल्या पालक मेळाव्याचे उदघाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ. कैलाश करांडे. पालक प्रतिनिधी डाॅ. साजिकराव पाटिल, राजनरेंद्र बडवे, प्रथम वर्ष अभियांत्रिकीचे विभाग प्रमुख प्रा. अनिल निकम आदी मान्यवरांच्या हस्ते सावित्रीबाई फुले व सरस्वती यांच्या प्रतिमेचे पुजन करून दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
यावेळी पालक प्रतिनिधी राजनरेंद्र बडवे यांनी महाविद्यालयांच्या शैक्षणिक प्रगतीचे कौतुक केले. महाविद्यालयात घेतल्या जाणा-या सर्वपरीक्षांचे गुण व विद्यार्थ्यांची हजेरी मोबाईल मॅसेज द्वारे आपला मिळते. त्यामुळे आमच्या पाल्यांची माहिती आम्हाला समजते असे मत बडवे यांनी व्यक्त केले.
या मेळाव्यात प्रा. अनिल निकम यांनी प्रथम वर्ष अभियांत्रिकी विभागाविषयी सर्व माहिती उपस्थिती पालकांना दिली. महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ. कैलाश करांडे यांनी पालकांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा. सुषमा कोडगिरी यांनी केले.
फोटो ओळी:- पंढरपूर सिंहगड मध्ये प्रथम वर्ष अभियांत्रिकी च्या पालक मेळाव्यात बोलताना पालक प्रतिनिधी डाॅ. साजिकराव पाटिल यावेळी व्यासपीठावर उपस्थित प्राचार्य डाॅ. कैलाश करांडे, प्रा. अनिल निकम व पालक प्रतिनिधी राजनरेंद्र बडवे आदी.
महाराष्ट्रातील नंबर वन!
ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 35 लाखाच्याही पुढे गेलेली आहे. 50 लाख वाचकांच्या टप्प्याकडे पंढरपूर लाईव्ह झेपावत आहे!
कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
उपसंपादक – विजयकुमार गायकवाड
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368, 8149624977
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368, 8149624977
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com







