Solapur Loksabha Election:पांडुरंग परिवार भक्कमपणे आमदार राम सातपुते यांच्या पाठीशी; मंगळवेढा तालुक्यातील पांडुरंग परिवाराची कार्यकर्ता विचार विनिमय बैठक उत्साहात

Loading

सोलापूर : प्रतिनिधी

पांडुरंग परिवार भक्कमपणे आमदार राम सातपुते यांच्या पाठीशी उभा आहे, असे प्रतिपादन माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी केले. मंगळवेढा तालुक्यातील पांडुरंग परिवाराची कार्यकर्ता विचार विनिमय बैठक मंगळवारी उत्साहात झाली.

प्रारंभी पांडुरग परिवारातर्फे आमदार राम सातपुते यांचा सत्कार करण्यात आला. माजी आमदार प्रशांत परिचारक म्हणाले, संपूर्ण पांडुरंग परिवार भाजप आणि महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांच्यासोबत आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत आमदार राम सातपुते यांचा विजय निश्चित आहे. गेल्या १० वर्षामध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये रस्ते, पाणीपुरवठा अशा अनेक बाबतीत मोठ्या प्रमाणावर कामे झाली आहेत. गावागावांत अनेक योजना यशस्वीपणे राबविल्या आहेत. आपल्या सोलापूरच्या सर्वागीण विकासासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सक्षम पर्याय आहेत. त्यामुळे देशभराचे सर्वमान्य नेतृत्व असलेल्या नरेंद्र मोदींना पुन्हा एकदा पंतप्रधान करण्यासाठी सर्वांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या शिलेदाराला राम सातपुते यांना मोठ्या संख्येने विजयी करा, असे आवाहन माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी याप्रसंगी केले.


माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या नेतृत्वाखाली पांडुरंग परिवारातर्फे सोलापूर जिल्ह्यातून एक कमळ दिल्लीला पाठवण्याचा निर्धार यावेळी उपस्थितांनी केला.

भाजप व महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते म्हणाले, सोलापूर जिल्ह्याच्या सर्वांगीण उन्नतीसाठी मी सदैव प्रयत्नशील असणार आहे. आगामी काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वामध्ये सोलापूर जिल्ह्यातील विकासकामे पूर्ण करणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील विकसित राष्ट्रासाठी तसेच  सोलापूरच्या विकासासाठी आपले बहुमूल्य मत महायुतीच्या उमेदवारालाच द्यावे, असे आवाहनही आमदार राम सातपुते यांनी याप्रसंगी केले.

याप्रसंगी चेअरमनसमाजी शिवानंद पाटील, बाबासाहेब पाटील, रामकृष्ण नागणे, युनूस शेख, नंदकुमार हावणाळे, सुदेश जोशी, काशिनाथ पाटील, भारत पाटील, सुधीर करंदीकर, शिवाजी घोडके, जगन्नाथ कोकरे, नामदेव जानकर, रामभाऊ माळी, भुजंगराव आसवे, जालिंदर व्हणुषगी, जम्मा जगदाळे, औदुंबर वाडदेकर, कांतीलाल ताटे, राजेंद्र चरवूकाका पाटील, डॉ. शरद शिर्के, हरिभाऊ यादव, बाळासाहेब यादव, गौरीशंकर बुरकुल, गोपाळ भगरे, महादेव लुगडे, गौडाप्पा बिराजदार, दिगंबर भाकरे, रेवणसिंहर लिगाडे, तानाजी कांबळे, अशोक माळी, राजाराम कोळी, उत्तम घोडके, पप्पू स्वामी, विष्णू मासाळ, बबलू सुतार, राजू पाटील, सुरेश जोशी, पिटू शिंदे, विठ्ठल बिराजदार, सचिन चौगुले, अर्जुन शिरोळे, प्रा. डी. वाय. पाटील, दत्ता नागणे, श्रीकांत साळे, बिरू घोगरे, मधवांनर आकळे, भारत लेंडवे, श्रीकांत गणपाटील, सिद्धेश्वर मेटकरी, भागवत माळी, भागवत घुसे, सिद्धेश्वर पाटील, बाळासाहेब चौगुले तसेच कार्यकर्ते उपस्थित होते.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *