इसिसच्या अतिरेक्याने सर्वांसमक्ष केली स्वत:च्या आईची हत्या

Loading

    • लंडन, दि. ८ – इसिसने आपल्या अतिरेक्यांमध्ये क्रौर्य ठासून भरले आहे. आतापर्यंत इसिसने पत्रकार, परदेशी नागरीकांची हत्या करताना क्रौर्याची परिसीमा गाठली होती. आता त्यापुढे जात इसिसच्या एका दहशतवाद्याने आपल्या स्वत:च्या आईवर धर्मत्यागाचा आरोप करीत अत्यंत निदर्यतेने सर्वांसमोर तिची हत्या केली. 
      सिरियातील रक्का शहरात ही घटना घडली. लंडनमधील इंडिपेंडट या वर्तमानपत्राने हे वृत्त दिले आहे. इसिसच्या अली साकर अल कासेम या अतिरेक्यांने आपल्याच आईवर धर्मत्यागाचा आरोप करीत सर्वांसमक्ष डोक्यात गोळी झाडून तिची हत्या केली. 
      ४५ वर्षीय लेना अल कासेम यांच्यावर इसिसने धर्मत्यागाचा आरोप ठेवला होता. लेना अल कासेम यांनी अलीकडे इसिस सोडण्याचा आग्रह धरला होता. आपण रक्का सोडून दुस-या शहरात जाऊया असे त्या अलीला सांगत होत्या. अलीने इसिसमधील आपल्या कमांडरना याची माहिती दिली. 
      इसिसला पाठिंबा न देणे, त्यांच्या विरोधात बोलण्याला इसिस धर्मत्याग ठरवते. त्यातूनच त्यांनी लेनावर धर्मत्यागाचा ठपका ठेवत तिच्या मुलालाच  तिची हत्या करण्याचे आदेश दिले. त्यानुसार अलीने सर्वांसमक्ष आपल्या आईच्या डोक्यात गोळी घालून तिची हत्या केली. 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *