
सोलापूर : मार्केट पोलीस चौकी ते ह. दे. प्रशालेपर्यंतच्या नव्याने तयार करण्यात आलेल्या आपत्कालीन रस्त्यावर व्यापार्यांनी दुकाने थाटली नसली तरी श्री सिद्धेश्वर देवस्थान पंच कमिटीने तो रस्ता बंद करण्याचा निर्णय घेतला. लोखंडी साहित्य, बांबू टाकून रस्त्यावरची वाहतूक रोखण्यात आली.
मार्केट चौकी ते ह. दे. प्रशालेपर्यंतच्या आपत्कालीन रस्त्याबाबत जिल्हाधिकारी आणि सिद्धेश्वर देवस्थान पंच कमिटीचा वाद शिगेला पोहोचला होता. मोर्चा, रस्ता रोको आंदोलनानंतर चक्री उपोषणही करण्यात आले. विभागीय आयुक्त चोक्कलिंगम यांनी आपत्कालीन रस्त्याबाबतचा निर्णय पोलीस आयुक्तांकडे सोपवला. पोलीस आयुक्त रवींद्र सेनगावकर यांनी रस्त्याचा ३३ टक्के भाग वापरण्यास परवानगी दिली होती. पंच कमिटीला तेही मान्य नव्हते. अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक निर्णय घेत संपूर्ण आपत्कालीन रस्ता पंच कमिटीला जेणेकरून यात्रेला देण्याचे आदेश दिले. एकीकडे मुख्यमंत्र्यांनी निर्णय दिला तर दुसरीकडे जनहित याचिकेबाबत सुनावणी झाली. नेमके काय करायचे, ही संभ्रमावस्था होम मैदानावर दुकाने थाटण्यासाठी आलेल्या व्यापार्यांची झाली होती.
मार्केट पोलीस चौकी ते ह. दे. प्रशालेपर्यंतचा आपत्कालीन रस्ता बंद करताना पंच कमिटीचे पदाधिकारी.