बैलगाडा शर्यतीला सुप्रीम कोर्टाची बंदी कायम

Loading

JANUARY 12, 2016

12 जानेवारी : 

केंद्र सरकारने बैलगाडा शर्यतीसाठी सोडलेली ‘वेसण’ सुप्रीम कोर्टाने आता रोखलीय. तामिळनाडूमध्ये जल्लिकट्टू या बैलांच्या स्पर्धांवर आणि राज्यातल्या बैलगाडा शर्यतींना सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली आहे. सुप्रीम कोर्टाचा अंतिम निर्णय अजून यायचाय, पण त्यावर आता तरी स्थगिती देण्यात आली आहे.

ग्रामीण भागात लोकप्रिय असलेल्या बैलगाडा शर्यतीवर केंद्र सरकारने बंदी उठवली होती. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी यासाठी विशेष पाठपुरावा केला होता. त्यांच्या या पाठपुराव्याची दखल घेत केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी बैलगाडा शर्यतींवर बंदी उठवण्याची अधिसूचना काढली होती. केंद्राच्या या निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. त्यावर आज कोर्टात सुनावणी झाली. कोर्टाने राज्यातील बैलगाडा स्पर्धा आणि तामिळनाडूमध्ये जल्लिकट्टू या बैलांच्या स्पर्धांवर बंदी कायम ठेवलीये. ऍनिमल वेल्फेअर बोर्ड आणि पेटा या प्राणीप्रेमी संस्थांनी या याचिका दाखल केल्या होत्या. मात्र, त्यामुळे केंद्र सरकार ऍनिमल वेल्फेअर बोर्डावर नाराज असल्याची सूत्रांची माहिती आहे.

महाराष्ट्र न्युज चे वाचक संपुर्ण महाराष्ट्रासह जगातील 
कानाकोपर्‍यातील मराठी माणसे 
मोठ्या संख्येने झालेले आहेत. 
अल्पकाळात हे ई-न्युज वेब पोर्टल यशस्वी केल्याबद्दल 
तमाम मराठी माणसांचे धन्यवाद..!

महाराष्ट्र Live News
मध्ये आपापल्या भागातील  ताज्या सत्य  बातम्या 
अथवा आपल्या भागातील सामाजिक समस्या आम्हाला
 खालील ई-मेल आयडी वर मेल करा.

livenewsmaharashtra@gmail.com

 योग्य त्या मजकुरास ठळक प्रसिध्दी दिली जाईल
-संपादकीय विभाग
अधिक माहितीसाठी
आमचा व्हाटस अप क्र. आहे 8552823399

गुगल प्ले स्टोअर वरुन महाराष्ट्र चे अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप्स
 आपल्या मोबाईलमध्ये अवश्य घ्या.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *