पंढरपूर लाईव्ह वृत्त
वाळू माफियांकडून जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांच्यावर प्राणघातक हल्ला झाल्याचे वृत्त चुकीचे असुन हा हल्ला माढा तालुक्यातील लऊळ या गावी मंडलाधिकारी मल्लिनाथ बंडय्या स्वामी (५६) यांच्यावर झाला आहे. अवैध वाळू वाहतुकीची मालमोटार थांबविण्याचा प्रयत्न केला असता स्वामी यांच्या अंगावर मालमोटार घालण्याचा प्रयत्न झाला. यासंदर्भात कुर्डूवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
माढा तालुक्यातल्या लऊळ येथे एका वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रक चालकानं महसुल कर्मचार्यांच्या अंगावर घालण्याचा प्रयत्न केलाय. सचिन मिसाळ असं
या ट्रक चालकाचं नांव असून तो परंडा तालुक्यातल्या शिरसावचा राहणारा आहे.
आज सकाळी साडेदहाच्या सुमारास
एम एच 12, सीएच 1167 हा वाळूचा लऊळ येथून निघाला होता.
तेव्हा महसुल कर्मचार्यांनी तो अडवण्याचा प्रयत्न केला असता
ट्रकचा चालक सचिन मिसाळ यानं मंडल अधिकारी मल्लीनाथ स्वामी यांच्या गाडीवर वाळूचा ट्रक घालून जीवे मारण्याचा प्रयत्न केलाय. याप्रकरणी दुपारी 12 वाजता
कुर्डूवाडी पोलीस ठाण्यात सचिन विरुद्ध जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे.
दरम्यान सोलापूरचे जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे हे महसुल कर्मचार्यांच्या कार्यशाळेसाठी माढ्याच्या दौऱ्यावर होते. त्यामुळे
त्यांच्या अंगावर ट्रक घालण्याचा प्रयत्न झाल्याची बातमी आली…..