
आयसीसीचे दहशतवादी मुंबई लोकलवर हल्ला करण्याच्या तयारीत असल्याची अफवा सध्या व्हॉट्सअपच्या माध्यमातून फिरत आहे. मात्र या अफवांवर विश्वास ठेवू नका, असं आवाहन खुद्द मुंबई पोलिसांनी केलं आहे. तसंच असे मेसेज फॉरवर्ड करु नका, अशा सूचनाही पोलिसांनी दिल्या आहेत.
काय आहे अफवा पसरवणारा मेसेज?
मुंबईत आयसिसचे दहशतवादी घुसले असून, ते लोकलवर हल्ला करण्याच्या तयारीत असल्याची अफवा, व्हॉट्सअपवर फिरत आहे. मात्र आता खुद्द मुंबई पोलिसांनीच अशा अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन केलं आहे.