
याआधी आयसिसच्या संपर्कात असल्याच्या संशयावरून मुंबईमधून खान हुसेन नावाच्या व्यक्तीला अटक करण्यात आलीये. एटीएस आणि एनआयएकडून चौकशी करण्यात आल्यानंतर हुसेनला काल शुक्रवारी अटक करण्यात आली. हुसेन माझगावचा आहे. तर गुरुवारी मुंबईतील मुंब्य्रातून मुदब्बीर शेख या तरुणाला अटक करण्यात आलीये.
त्यापूर्वी मुंबई, हैदराबाद, बंगळुरू, दिल्ली आणि उत्तराखंडमध्ये एनआयएनं छापे टाकले आणि सहा संशयित दहशतवाद्यांना अटक करण्यात आली तर 8 जणांची चौकशी सुरू आहे.