पंढरपूर तालुक्यात चारा छावण्या सुरू करण्याची संभाजी आरमारची मागणी

Loading

पंढरपूर तालुक्यात चारा छावण्या सुरू करण्याची संभाजी आरमारची मागणी
पंढरपूर । प्रतिनिधी,
सोलापूर
जिल्ह्यात दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. विहिरीचे पाणी आटले
आहे, बोअरचे पाणी कमी झाले आहे. त्यामुळे शेतकरी हवालदील झाला आहे. पाणी
नसल्यामुळे शेतकर्‍याची उभी पिके जळू लागली आहे. त्यामुळे पंढरपूर
तालुक्यात चारा छावण्या सुरू करण्याची मागणी प्रांत अधिकारी संजय तेली
यांच्याकडे संभाजी आरमारचे पंढरपूर शहर प्रमुख धनराज लटके यांनी
निवेदनाद्वारे केली आहे.
सदर निवेदनात असे म्हटले आहे की, जनावरांना
चारा, पाणी मिळत नसल्यामुळे शेतकर्‍यांना जनावरे कवडी मोल किंमतीने
विकण्याची वेळ आली आहे. त्यामुळे प्रांत साहेब यांनी पंढरपूर तालुक्यातील
शेतकर्‍यांचा विचार करून जनावरांसाठी चारा छावणी सुरू करावी अशी मागणी
निवेदनाद्वारे केलेली आहे.
सदरचे निवेदन देताना छावाचे जिल्हाध्यक्ष
संतोष भोसले, विकी झेंड,   युवक काँग‘ेसचे शहराध्यक्ष शंकर सुरवसे, सोपान
काका देशमुख, आधार प्रतिष्ठानचे अतुल लटके, सागर चव्हाण, विशाल यादव, संतोष
खिलारे यांच्यासह कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *