क्रीडा शिक्षकाने आदी खेळाच्या प्रकाराची माहिती समजून घ्यावी. त्यानंतरच पंढरपूर तालुक्याच्या राजकीय इतिहासावर बोलावे. क्रीडा शिक्षकाचा आणि इतिहासाचा काही संबंध नसणार्यांनी चुकीची माहिती देऊन दामाजी कारखान्याच्या सभासदांची दिशाभूल करणे असा टोला आमदार श्री भारतनाना भालके यांनी प्रा.येताळा भगत यांना लगावला.
येथील श्रीसंत दामाजी सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुक प्रचाराच्या निमित्ताने आज मारापूर, ता.मंगळवेढा येथील प्रचार सभेत ते बोलत होते. सभेच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष श्री पी.बी.पाटील हे होते.
यावेळी बोलतांना आमदार श्री भारत भालके म्हणाले की, प्रा.येताळा भगत हे पी.टी.चे शिक्षक आहेत. त्यांचा इतिहासाचा आणि सणावळींचा काहीही संबंध नाही. श्री विठ्ठल कारखान्याचे माजी चेअरमन कै.राजाभाऊ पाटील आणि मी स्वतः व्हा.चेअरमन असतांना आमचेवरती अविश्वास ठराव दाखल केला होता. अशी त्यावेळी राजकीय परिस्थिती घडलेली असतांना प्राध्यापक महाशयांना पंढरपूर तालुक्याच्या राजकीय इतिहासाची कोणतीही माहिती नसतांना कै.औदुंबरआण्णा पाटील यांच्यावरती अविश्वास ठराव दाखल केल्याची चुकीची माहिती देत आहेत. कै.वसंतदादा काळे यांच्या नेतृत्वाखाली श्री विठ्ठल कारखान्यावरती सत्तांतर झाले होते. त्यांच्या निधनानंतर विठ्ठल परिवाराचे नेते श्री कल्याणराव काळे यांनी स्वतः चेअरमन निवडीची तारीख देऊन सर्वानुमते कारखान्याच्या अध्यक्षपदी माझी निवड केली. तेंव्हापासून आजतागायत कै.औदुंबरआण्णा पाटील, कै.राजाभाऊ पाटील, कै.वसंतदादा काळे यांच्या विचारांनुसार कारखान्याचा आदर्श कारभार केला आहे. त्यामुळेच आज श्री विठ्ठल कारखान्याच्या सुमारे 30 हजार सभासदांनी चौथ्यांना माझ्यावर विश्वास टाकलेला आहे.
श्री विठ्ठल कारखान्यानुसारच श्रीसंत दामाजी कारखान्याची सुध्दा प्रगती करण्याचा गेल्या 5 वर्षात प्रामाणिक प्रयत्न केला आहे. यापुर्वीच्या संचालक मंडळांनी ऊस उत्पादक सभासदांना कधीही दूसरे-तिसरे अॅडव्हान्स बिल दिले गेले नाही. एका बिलावरतीच सभासदांना समाधान मानावे लागले आहे. गेल्या 5 वर्षामध्ये ऊस उत्पादक सभासदांना आपण अंतिम ऊस बिल देण्यात यशस्वी ठरलो आहोत. कामगारांचा थकीत 31 महिन्यांचा पगार दिला. आज कामगारांना इतर कारखान्यांप्रमाणे बोनस, बक्षिस, ङ्गरकाची रक्कम व वेळेत पगार दिला जात आहे. शिवाय ऊस उत्पादक सभासदांचा अपघाती विमा योजना सुरू केली आहे. हे कारखान्याचे चित्र कायमस्वरूपी ठेवण्यासाठी कै.मारवाडी वकील, कै.रतनचंद शहा यांच्या राजकीय आदर्श संस्कारानुसार दामाजी कारखान्याचा कारभार केला आहे. यावर्षी दामाजी साखर कारखाना हा एङ्ग.आर.पी.प्रमाणे रू.1823/- चा पहिला हप्ता देणारा एकमेव कारखाना आहे. जिल्ह्यातील अन्य कारखान्यांनी रू.1700/- च्या आसपास पहिला हप्ता दिला. त्या तुलनेने दामाजीच्या सभासदांना सर्वाधिक पहिला हप्ता देण्यात यश मिळाले आहे. हे सारे कारखान्याच्या आर्थिक प्रगतीचे लक्षण आहेत.
2..
– 2 –
यावेळी सर्वश्री पी.बी.पाटील, पांडुरंग भाकरे, ज्ञानेश्वर पुजारी, शिवानंद पाटील, राहुल शहा आदींची भाषणे झाली. सदर सभेला दामाजी कारखान्याचे चेअरमन श्री शशिकांत बुगडे तसेच सर्वश्री भारत दत्तु, बाबा कोंडुभैरी, सुनिल डोके, तानाजी पाटील, दयानंद सोनगे, सुरेश कोळेकर, तानाजी काकडे, यादाप्पा माळ, बसवराज पाटील, दिनकर यादव, सौ.रतन मेटकरी, सौ.अंजली पवार, रमेश भांजे, तानाजी खरात, युवराज शिंदे, ज्ञानेश्वर खांडेकर, आप्पा चोपडे, मारूती वाकडे, शंकर पवार, रामभाऊ जगताप, दत्ता कांबळे, दत्तात्रय यादव, दत्ता जाधव, तानाजी पाटील, विठ्ठल डोके, दादा पवार, माणिक पवार, अशोक पवार, भारत बेद्रे, महादेव ङ्गराटे, पोपट पडवळे, उध्दव बेद्रे, सुभाष माने, भगवान बुरले, हरीबा ढेकळे, संजय ढेकळे, आनंदा बुगडे, विलास बनसोडे, आण्णा ढेकळे, गजेंद्र चौगुले, दशरथ चौगुले, सत्यवान लेंडवे, सिध्देश्वर सलगर, विठ्ठल चौगुले, चंदू रायबान, भाऊ गोडसे, भारत रायभान, औदुंबर मोरे, आबा मोरे, मंगेश मोरे, रामा हेंबाडे, पंपू मोरे, अब्बास मुलाणी, ङ्गंटू मोरे, राजु पाटील, औदुंबर कसगावडे, संतोष माने, शंकर आसबेसर, मुकूंद कदम, विक्रम यादव, हरिभाऊ यादव, काका डोंगरे, महादेव ढोणे, बाळासोा जांभळे, संतोष पाटील, बाळासोा ढोणे, लिंगराज झांबरे, देविदास इंगवले, संतोष लेंडवे, बाळू सुडके, अभंगा लेंडवे, दादा बाळा लेंडवे, सिध्देश्वर लेंडवे, समाधान दत्तु, शिवाजी जाधव, महादेव चव्हाण, शरद चव्हाण, नेताजी चव्हाण, अनिल रणदिवे, विठ्ठल शिंदे, शिवाजी शिंदे, राजु काळुंगे, श्रीमंत मोहिते, यादव आवळेकर, अर्जुन खांडेकर, विकास सोनवले, अनिल आदलिंगे, नागेश स्वामी, आदींसह सभासद शेतकरी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.