Loksabha Election 2024 : सुजाण नागरिक हो…. चला 7 मे रोजी मतदान करून लोकशाहीच्या उत्सवात सहभागी होऊ या….!

Loading

Pandharpur Live News : भारत निवडणूक आयोगाने दिनांक 16 मार्च 2024 रोजी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 चा कार्यक्रम जाहीर केला. संपूर्ण देशभरात सात टप्प्यामध्ये 543 मतदार संघासाठी निवडणूक घेण्याचे घोषित केले. महाराष्ट्र राज्यात 48 लोकसभा मतदारसंघासाठी पाच टप्प्यात निवडणूक कार्यक्रम घोषित झाला असून सोलापूर जिल्ह्यातील 2-सोलापूर व 43-माढा लोकसभा मतदारसंघासाठी दिनांक 7 मे 2024 रोजी म्हणजेच तिसऱ्या टप्प्यात मतदान होणार आहे. 

सकाळी सात ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत दोन्ही मतदारसंघातील 40 लाख मतदार आपला मतदानाचा

हक्क बजावण्यासाठी तयार असतील. जिल्हा प्रशासनाने माहे ऑक्टोबर 2023 पासून ते आज रोजी पर्यंत स्वीप

अंतर्गत मतदार जनजागृती चे अनेक कार्यक्रम घेऊन मतदारांना मतदानासाठी प्रोत्साहित केले जात आहे. त्यामुळे

जिल्ह्याची मतदानाची टक्केवारी 70% पेक्षा अधिक जाईल याबाबत जिल्हा प्रशासनाला खात्री आहे."

भारत देशात लोकशाहीचे सर्वात मोठे पर्व सुरू आहे. येथील नागरिकांसोबतच संपूर्ण जगासाठी हा एक

लोकशाहीचा उत्सवच आहे. भारतीय लोकशाही प्रणाली ही जगातील सर्वात मोठी संसदीय लोकशाही प्रणाली आहे.

या लोकशाही प्रणाली मुळेच भारत देशात अनेक धर्म, जाती, पंथाचे लोक बंधू भावाने राहतात. येथे विविधतेमध्ये

एकतेची भावना आहे. अशा या देशाच्या लोकशाहीसाठी भारत निवडणूक आयोग सात टप्प्यांमध्ये निवडणुका घेत

आहे. येथील मतदार हे मतदानाला पवित्र कर्तव्य समजून मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदान केंद्रावर जाऊन

मतदान करतात.



सोलापूर जिल्ह्यातील सोलापूर व माढा या दोन लोकसभा मतदारसंघासाठी मंगळवार दिनांक 7 मे 2024

रोजी मतदान होणार आहे. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासनाने माहे ऑक्टोबर

नोव्हेंबर 2023 पासून स्वीप अंतर्गत मतदार जनजागृती मोहीम सुरू केलेली आहे. या कालावधीत जवळपास 1 लाख

25 हजार नवीन मतदारांची नोंदणी केलेली आहे. तसेच या अंतर्गत महाविद्यालय विविध गाव शहरे नागरी विभाग

विद्यार्थी नागरिकांमध्ये मतदार नोंदणीत नाव नोंदणी करणे तसेच मतदान करण्याविषयी जनजागृती केलेली आहे.

मतदान करणे हा आपला हक्क असून मतदान केल्याने भारतीय लोकशाही प्रणाली कशा पद्धतीने सुदृढ होऊ शकते

याबाबत मतदारांमध्ये जागृती केली आहे.

जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद हे जिल्ह्यातील जास्तीत जास्त मतदारांनी मतदान केंद्रावर येऊन आपले

मतदानाचे पवित्र कर्तव्य पार पाडावे यासाठी प्रत्येक मतदान केंद्रावर मतदानासाठी आवश्यक असलेल्या सर्व

पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी प्राधान्य देत आहे. जिल्ह्यातील तीन हजार सहाशे सतरा मतदान केंद्रावर

प्रशासनाच्या वतीने मतदान केंद्र व परिसर स्वच्छ ठेवणे, मतदारांना रांगेत जास्त वेळ उभा राहण्यास लागू नये

यासाठी ठराविक अंतरावर खुर्च्या व बेंच ठेवले जात आहेत. मतदारांना मतदान केंद्रावर पिण्यासाठी पाणी,

शौचालयाची स्वच्छता, उष्णतेची तीव्रता लक्षात घेऊन सावलीसाठी मंडप बरोबरच प्रत्येक मतदार केंद्रावर 30 ओ

आर एस पॉकेट ची व्यवस्था, प्राथमिक आरोग्य उपचार किट, मोबाईल हेल्थ टीम या सुविधा उपलब्ध करून दिल्या


जात आहेत. तसेच स्वतः जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोरामणी येथून

मतदान केंद्र परिसर स्वच्छता मोहिमेचा शुभारंभ केलेला होता.

सन 2019 च्या लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत सोलापूर जिल्ह्याचे मतदान टक्केवारी जवळपास 61 टक्के

इतकी होती. यावर्षीच्या निवडणुकीत मतदानाची टक्केवारी 70 टक्के पेक्षा अधिक होण्यासाठी जिल्हा प्रशासन प्रमुख

म्हणून जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद व माढा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी मोनिका सिंह ठाकुर

स्वतः लक्ष घालून प्रत्येक मतदान केंद्रावर मतदारांसाठी आवश्यक असलेल्या सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून

देण्यासाठी प्रयत्न करत आहेत. प्रत्येक मतदान केंद्रावर दिव्यांग मतदार करण्यासाठी व्हीलचेअर, रॅम्प, लोकसभा

मतदारसंघांतर्गत प्रत्येक विधानसभा मतदारसंघ निहाय एक पीडब्ल्यूडी मतदान केंद्र(11), तरुणांसाठी दोन मतदान

केंद्र(22), व महिलांसाठी दोन मतदान केंद्र(22) करण्यात आले असून प्रत्येक मतदान केंद्रावर हिरकणी कक्षही

निर्माण करण्यात आलेले आहेत.

भारत निवडणूक आयोग, महाराष्ट्र राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी व जिल्हा प्रशासन मतदान जागृतीसाठी

करत असलेल्या उपाययोजना पाहून जिल्ह्यातील सर्व सुजाण नागरिक हो दिनांक 7 मे 2024 रोजी घराबाहेर पडून

आपले मतदान असलेल्या मतदान केंद्रावर जावून आपला मतदानाचा हक्क, आपले पवित्र कर्तव्य पार पाडावे असे

आवाहन करण्यात येत आहे. आपले एक मत सुदृढ लोकशाहीसाठी खूप महत्त्वपूर्ण आहे, त्यामुळे मतदानाचा हक्क

बजावून लोकशाहीच्या या उत्सवात सक्रिय सहभाग घ्याल याची खात्री वाटत असल्याने जिल्ह्याच्या मतदानाची

टक्केवारी 70 टक्के पेक्षा अधिक होईल असे वाटते.


उत्सव निवडणुकीचा

अभिमान देशाचा !


सुनील सोनटक्के

जिल्हा माहिती अधिकारी

सोलापूर

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *