सिंधुदुर्गात माकड तापामुळे एक जण दगावला

Loading

सिंधुदुर्ग – 29 जानेवारी : राज्यात पहिल्यांदाच सिंधुदुर्गात आढळून आलेल्या माकडतापा(क्यासनूर फॉरेस्ट डीसीज)च्या रुग्णांमुळे राज्याची आरोग्य यंत्रणा हादरून गेलीय. या तापामुळे एकाचा मृत्यू झालाय.
सिंधुदुर्गातल्या केर गावात लागण झालेल्या या तापाच्या रुग्णांपैकी 18 रुग्णांचे रक्तनमुने माकडतापाच्या आजाराचे आढळले आहेत. एक जण या तापाने दगावला असून सध्या या गावात आरोग्य विभागाची दोन पथके कार्यरत करण्यात आली आहेत. 4 जानेवारीपासून या गावात तापाचे रुग्ण आढळत असून हा ताप विषाणूजन्य असल्यामुळे कोणतीही लस सध्या तरी या आजारावर उपलबध नसल्याचं आरोग्य विभागाकडून सांगण्यात येतंय.
प्राथमिक लक्षणे
– अचानक थंडी , ताप आणि तीव्र डोकेदुखी
 काय आहे माकड ताप ?
– भारतात सर्वप्रथम 1957 साली कर्नाटकच्या क्यासनूर जंगलानजीकच्या वस्तीत हा आजार आढळून आला
– कर्नाटकच्या पाच जिल्ह्यात 400 ते 500 जणांना या तापाने ग्रासलं होतं.
– बाधीत किंवा मृत माकडांच्या अंगावर असलेल्या गोचीड माणसाला चावल्यास हा आजार पसरतो
– 2012 मध्ये कर्नाटकच्या शिमोगा जिल्ह्यात या तापाचे 292 रुग्ण आढळले
– गेल्यावर्षी गोव्यातल्या वाळपई तालुक्यातल्या चार जणांचा यामुळे मृत्यू 
– या आजारात मृत्यूचं प्रमाण पाच टक्के 
– महाराष्ट्रात पहिल्यांदाच सिंधुदुर्गात हा आजार आढळून आलाय
– तामिळनाडू आणि केरळमधल्या काही भागातही या आजाराचे रुग्ण आढळले

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *