विशाखापट्टणम : ईशान किशनच्या युवा टीम इंडियाला अंडर-19 विश्वचषकात अखेर उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं आहे. बांगलादेशात मिरपूरमध्ये झालेल्या अंतिम सामन्यात वेस्ट इंडिजनं भारतावर 5 विकेट्स राखून मात केली.
भारतानं दिलेल्या 146 धावांच्या लक्ष्याचा विंडीजच्या युवा टीमनं यशस्वी पाठलाग केला. खरं तर आवेश खान, खलिल अहमद आणि मयांक डागरनं वेस्ट इंडीजची 5 बाद 77 अशी अवस्था करून भारताच्या आशा उंचावल्या होत्या. पण पॉल आणि कार्टीनं 69 धावांची भागीदारी करून विंडीजला विजय मिळवून दिला.
त्याआधी, सरफराज खाननं त्याच्या लौकिकाला साजेसा खेळ करून अर्धशतक झळकावलं. त्यानं 89 चेंडूंत पाच चौकार आणि एका षटकारासह 51 धावांची खेळी उभारली. पण सरफराजला समोरच्या एंडनं चांगली साथ मिळाली नाही. त्यामुळं भारताचा अख्खा डाव अवघ्या 145 धावांत आटोपला. विंडीजच्या अलझारी जोसेफ आणि रायन जॉन यांनी प्रत्येकी तीन विकेट्स घेतल्या.