पुण्यातील रेडिओ जॉकींना “ बेस्ट आरजे “पुरस्कार

Loading

पुण्यातील रेडिओ जॉकींना “ बेस्ट आरजे “पुरस्कार

अनिल चौधरी ,पुणे

पुणे जिल्ह्यातील अतिशय सुप्रसिद्ध असे रेडीओ चॅनेल रेडिओ एफ एम व रेडीओ मिर्ची या चॅनेल चे रेडिओ जॉकी आरजे श्रुती व आरजे सुमित यांना पत्रकार संरक्षण समिती तर्फे “ बेस्ट आरजे “ हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

पत्रकार संरक्षण समिती तर्फे पनवेल येथे “आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह “ या ठिकाणी   पहिल्या राज्यस्तरीय पुरस्काराचे आयोजन करण्यात आले होते . विविध क्षेत्रातील सामाजिक , वैद्यकीय , रेडीओ ,उद्योगक्षेत्र ,पत्रकार , इलेक्ट्रानिक मिडीया ,तसेच आदर्श मातांचा  शाल, श्रीफळ, प्रमाणपत्र,ट्रॉफी  देऊन  गौरविण्यात आले. यामध्ये समितीचे अध्यक्ष विनोद पत्रे व नागरी संरक्षण दलाचे उपनियंत्रक बाळासाहेब आढागळे  यांच्या हस्ते पुण्यातील आरजेंना  यांना “ बेस्ट आरजे “  पुरस्काराने गौरविण्यात आले.

रेडीओ एफ एम चॅनेल ९३.५ रेड एम च्या आरजे श्रुती यांना “ बेस्ट आरजे “ पुरस्कार नागरी संरक्षण दलाचे उपनियंत्रक बाळासाहेब आढागळे  यांच्या हस्ते देण्यात आला . यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना श्रुती म्हणाल्या मला लहानपणापासून पुरस्कारांबद्दल फार उत्सुकता होती .आता पुरस्कार मिळाल्याबद्दल माझी जबाबदारी खूप वाढली आहे. रेडिओ वरून  बोलताना खूप लोक आम्हाला ऐकत असतात ,परंतु आज  पुरस्कार मिळाल्याने सर्व लोकांच्या समोर येऊन लोकांशी बोलताना खूप आनंद होत आहे.

रेडीओ एफ एम चॅनेल ९८.३  रेडीओ मिर्ची चे आरजे सुमित यांना पत्रकार संरक्षण समितीचे अध्यक्ष विनोद पत्रे यांच्या हस्ते  “ बेस्ट आरजे “ पुरस्कार देऊन गौरविण्यात आले . यावेळी बोलताना आरजे सुमित म्हणाला , पुरस्कार मिळाल्याने खूप आनंद झाला आहे . पत्रकार संरक्षण समितीला मी खूप खूप धन्यवाद देतो.

याप्रंगी माजी खासदार रामशेठ ठाकूर ,न्यूज नेशन चे चीफ  एडिटर सुभाष शिर्के , कृषी अधिकारी प्रीतमसिंग राजपूत, पुणे जिल्हा नागरी संरक्षण दलाचे उपनियंत्रक बाळासाहेब अढागळे , महाडचे तहसीलदार संजय पाटील ,   प्रदेश अध्यक्ष नंदकिशोर धोत्रे , सचिव विजय सूर्यवंशी ,पुणे अध्यक्ष – प्रदेश प्रसिद्धी प्रमुख अनिल चौधरी , राष्ट्रीय अध्यक्ष अशोक मात्रे  ,उपाध्यक्षा अमिता चौहान , रूपा सिन्हा ,आत्माराम तांडेल , सुरज देवताळे , मदन पाटील , डॉन के के , यशवंत पवार , अमोल मराठे , जयवंत पाटील आदी उपस्थित होते .

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *