आषाढी वारी पार्श्वभूमीवर संबंधित विभागांनी त्यांच्याकडील कामे जबाबदारीने पार पाडावीत- जिल्हाधिकारी रणजित कुमार

Loading

        

पंढरपूर, दि. 08 :- आषाढी यात्रा सुरळीतपणे व यशस्वीपणे पार पाडण्यासाठी प्रशासनाने आवश्यकती तयारी व उपाय योजना केल्या असून संबंधित विभागांनी त्यांच्याकडे सोपविलेल्या कामाचे योग्य नियोजन करुन ही कामे प्राधान्याने व मुदतीत पूर्ण करावीत अशा सूचना जिल्हाधिकारी रणजित कुमार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

             आषाढी यात्रा नियोजनाबाबत येथील सांस्कृतिक भवन येथे आयोजित केलेल्या बैठकीत  जिल्हाधिकारी बोलत होते. बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अरुण डोंगरे, पोलीस अधीक्षक विरेश प्रभू, अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रविणकुमार देवरे,अतिरिक्त पोलीस अधीक्षक मनिषा दुबुले, प्रांताधिकारी संजय तेली व दादासाहेब कांबळे यांच्यासह सर्व संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
            जिल्हाधिकारी म्हणाले, आषाढी वारी यशस्वीपणे पार पाडण्यासाठी प्रशासनाकडून तयारी झाली आहे. यासाठी संबंधित विभागानी त्यांच्याकडील कामे दर्जेदार, गुणवत्तापूर्ण व मुदतीत पूर्ण करण्यावर भर द्यावा. तसेच झालेल्या कामांचा अहवाल उपविभागीय अधिकारी, पंढरपूर यांच्याकडे सादर करण्याच्या सूचनाही त्यांनी बैठकीत दिल्या. सार्वजनिक बांधकाम विभागाने  पालखी मार्ग, पालखी तळावरील कामे प्राधान्याने पूर्ण करण्याबरोबरच अपूर्ण असलेल्या रस्त्यांची कामे त्वरित सुरु करावीत. एस.टी. महामंडळाने चंद्रभागा बसस्थानक येथे मुरमीकरण करुन घ्यावे. तसेच या ठिकाणी पाणी, वीज आणि शौचालयाची व्यवस्था करण्यात यावी. नगरपालिकने स्वच्छता, अतिक्रमण, धोकादायक इमारती, पार्किंग, स्वच्छ पिण्याचे पाणी, आरोग्य शौचालये या कामांना प्राधान्य देण्याच्या सूचनाही त्यांनी बैठकीत दिल्या.
            बैठकीत नगरपालिका, आरोग्य विभाग, मंदिरे समिती, प्रादेशिक परिवहन, एस. टी. महामंडळ, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण, सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषद बांधकाम विभाग, राष्ट्रीय महामार्ग, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, महसूल विभाग, रॉकेल व गॅस वितरण, पंचातय समिती, बीएसएनएल व अन्य  विभागांमार्फत करण्यात येणाऱ्या कामांचा आढावा घेण्यात आला. तसेच या पुढील करावयाच्या कामांबाबतच्या  सूचना देण्यात आल्या.
            तत्पूर्वी जिल्हाधिकारी रणजित कुमार यांनी 65 एकर, चंद्रभागा बस स्थानक, जुना अकलुज रस्ता, पालखी मार्ग, पत्रा शेड, दर्शन रांग परिसराची पाहणी केली व संबंधित यंत्रणेला आवश्यकत्या सूचना केल्या. यावेळी त्यांच्यासमवेत पोलीस अधीक्षक विरेश प्रभू, अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रविणकुमार देवरे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक मनिषा दुबुले, प्रांताधिकारी संजय तेली व दादासाहेब कांबळे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता एस.टी. राऊत उपस्थित होते.
0000000
तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील कामांचा
अतिरीक्त जिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा
पंढरपूर, दि. 08 : – तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातंर्गत करण्यात येत असलेल्या कामांचा अतिरीक्त जिल्हाधिकारी प्रविणकुमार देवरे यांनी येथील शासकीय विश्रामगृह येथे आढावा घेतला. यावेळी प्रांताधिकारी संजय तेली व दादासाहेब कांबळे, जिल्हा नियोजन अधिकारी एस. व्ही. धुमाळ, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता एस.टी. राऊत नगपालिकेचे मुख्याधिकारी शंकर गोरे, एमएसइबीचे श्री. घाटोळे यांच्यासह सर्व संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते. बैठकीत पालखी मार्गावरील रस्त्यांची कामे, हेलीपॅड, 65 एकर येथील कामे, प्रदक्षणा मार्गावरील कामे व विद्युतीकरण, शौचालये, पालखी तळ, वाळवंट येथे विद्युत पुरवठा आणि एमटीडीसीकडील कामांचा आढावा घेण्यात येऊन संबंधितांना आवश्यकत्या सूचना देण्यात आल्या.
000000

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *