मंगलमूर्ती फिल्म्स चा दुसरा जीवनपट येत्या 24 जूनला होणार प्रदर्शित…

Loading

अनिल चौधरी, 
पुणे :-

बऱ्याच यशस्वी हिंदी चित्रपटांचे यश गाठीला घेऊन दगडी चाळ या चित्रपटाच्या निमित्ताने मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करणारी मंगलमूर्ती फिल्म्स ही चित्रसंस्था आता अजून एक जीवनपट घेऊन येत आहे. भगवान आबाजी पालव म्हणजेच आपले भगवान दादा यांचा जीवनपट मंगलमूर्ती फिल्म्स प्रस्तुत आणि किमया मोशन पिक्चर्स निर्मित ‘एक अलबेला’…
शोला जो भडके दिल मेरा धडके…दर्द जवानी का सताये बढबढके… म्हणत सगळ्यांनाच साध्या सरळ नृत्याकडे आकर्षित करणाऱ्या भगवान दादांच्या जीवनावर चित्रपट येऊ घातला आहे. गेले कित्येक दिवस हा चित्रपट विविध कारणांनी चर्चेत आहे. भगवान दादांची भूमिका मंगेश देसाई साकारत आहे. त्यांनी आत्मसात केलेला भगवान दादांचा लूक, अभिनय आणि त्यांची नृत्यशैली याची चर्चा सिनेसृष्टीत सुरू आहे. या चित्रपटाचा अजून एक चर्चेचा विषय म्हणजे बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालन… हिंदी सिनेसृष्टीतील उल्लाला गर्ल…विद्या बालन यात गीता बालीच्या भूमिकेत दिसणार आहे.
शेखर सरतांडेल यांच्या दिग्दर्शनाने सजलेला असा ‘एक अलबेला’ हा जीवनपट येत्या 24 जून ला सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *