![]()
पंढरपूर- दि. 10 – घराचे (मातीचे) छत कोसळून एकाच कुटुंबातील चौघेजण ठारझाल्याची दुर्दैवी पंढरपुर तालुक्यातील मुंढेवाडी गावात घडली. मृतांमध्ये
पती-पत्नीसह मुलगा व मुलीचाही समावेश असून मध्यरात्रीच्या सुमारास घडलेल्या
या घटनेमुळे गावात शोककळा पसरली आहे.
बशीर हुसैन शेख( वय 27), नफीसा बशीर शेख( वय 22) साहिल बशीर शेख(वय 8) आणि आलिशा बशीर शेख (वय 6) अशी मृतांची नावे असून गाढ झोपेत असतानाच मृत्यूने त्यांच्यावर घाला घातला.
ढिगार्यातून मृतदेह बाहेर काढले असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
