लोकसभा निवडणूकीसाठी नरेंद्र मोदी यांनी वाराणसी येथून तिसऱ्यांदा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावेळी भाजपकडून जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात आले. तसेच भाजपची सत्ता असलेल्या राज्यांचे मुख्यमंत्री देखील यावेळी उपस्थित होते. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह प्रफुल्ल पटेल देखील वाराणसीमध्ये होते. यावेळी प्रफुल्ल पटेल यांनी पंतप्रधान मोदी यांना छत्रपती शिवाजी महाराज यांचे प्रतिक असलेला जिरेटोप परिधान केला. यानंतर महाराष्ट्रातील सर्व स्तरातून नाराजी व्यक्त केली जात आहे. यानंतर राजकीय वर्तुळामध्ये संतापाची लाट उसळलेली असून भाजप नेत्यांकडून सावरासावर केली जात आहे.
छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांचे प्रतिक असलेला जिरेटोप महाराष्ट्रासाठी अत्यंत महत्त्वाचे प्रतिक आहे. फक्त छत्रपतीच जिरेटोर परिधान करु शकतात. जिरेटोपाशी महाराष्ट्रातील लोकांच्या भावना जोडलेल्या असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जिरेटोप घातल्यामुळे राज्यातून संताप व्यक्त होत आहे. यावर शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांनी देखील नाराजी व्यक्त केली. ‘आपण काय करत आहोत, हे प्रत्येकाला कळायला हवे’ अशी प्रतिक्रिया अमोल कोल्हे यांनी दिली आहे.
पंतप्रधानांना जिरेटोप घातल्याने संभाजी ब्रिगेड देखील आक्रमक झाली आहे. खरमरीत प्रतिक्रिया देत संभाजी ब्रिगेडने खडेबोल सुनावले आहेत. संभाजी ब्रिगेडचे संतोष शिंदे म्हणाले, “छत्रपती शिवाजी महाराज यांच्याव्यतिरिक्त अन्य कोणीही जिरेटोप परिधान करू नये, असा संकेत आहे. छत्रपती शिवाजी महाराज किंवा छत्रपती संभाजी महाराज यांचा अभिनय करतानाही संपूर्ण वेशभूषा परिधान केल्यानंतर जिरेटोप परिधान करण्याचा प्रघात आहे. पंतप्रधान मोदी हे छत्रपती नाहीत. केवळ छत्रपती हा जिरेटोप परिधान करू शकतात. जिरेटोपाचा अवमान करण्यात येऊ नये. मोदी यांची मर्जी संपादन करण्यासाठी राज्यातील नेते किती लाचार होत आहेत, हे यावरून दिसून येते,” अशी बोचरी टीका संभाजी ब्रिगेडकडून करण्यात आली आहे.
पटेलांच्या या कृतीवर आता हिंदु महासभा आणि संभाजी ब्रिगेडने आक्षेप घेतल्याने मोठा वाद पेटलाय. असे असतानाचा आता शिवसेना युबीटी प्रमुख उद्धव ठाकरे (Udhhav Thackeray) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Narendra Modi) आणि प्रफुल पटेलांवर (Praful Patel) बोचरी टीका केली आहे. तुम्ही हा महाराजांचा अपमान करताय. तुम्ही लाचार झालायत, अशी टीका ठाकरेंनी केली आहेत. (udhhav thackeray criticize praful patel and narendra modi gift jiretop varanasi before file nomination)
पालघर लोकसभा मतदार संघात महाविकास आघाडीच्या उमेदवार भारती कामडी यांच्या प्रचारार्थ सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेतून ठाकरेंनी वाराणसीतील त्या घटनेवर भाष्य केले. ‘प्रफुल भाई लाचारी किती करावी…तुम्ही त्यांना टोप्या घाला, दुसऱ्या कोणत्याही घाला, पण महाराजांच जिरेटोप ज्यांच्यावर डोक्यावर ठेवताय, ते डोकं कसं आहे ते तपासा,असा हल्ला ठाकरेंनी मोदींवर चढवला. तसेच प्रफुलभाई हा तुम्ही महाराजांचा अपमान करताय, तुम्ही लाचार झालात, मोदींच्या चरणी लीन होताना तुम्ही माझ्या छत्रपतींच्या जिरेटोपाची शान घालवताय. मोदींनी असं महाराष्ट्रासाठी केलंय तरी काय?’ असा सवाल देखील ठाकरेंनी यावेळी उपस्थित केला.