👁 7 Views

चंद्रभागेच्या पात्रात वाहने धुण्याचा प्रकार… हायकोर्टाच्या आदेशाची पायमल्ली ! विक्रम शिरसट यांची गांधीगीरी..!

Pandharpur Live 20 may 2017

भुवैकुंठ पंढरी नगरीतील वाळवंटाचे पावित्र्य राखले जावे व पर्यावरणाची हानी होऊ नये या उद्देशाने मा.मुंबई उच्च न्यायालयाने चंद्रभागेच्या पात्रात वाहने सोडण्यास व नदीच्या पात्रात वाहने धुण्यास मनाई केली आहे.मात्र कोर्टाच्या या आदेशाचे सर्रास उल्लंघन होत असून सकाळच्या वेळी चंद्रभागा नदीच्या पात्रात अनेक चारचाकी वाहने धुण्यात येत असल्याचा प्रकार घडत आहे.या ठिकाणी लावण्यात आलेल्या उच्च न्यायालयाच्या आदेशाची माहीती देणार्‍या फलकाकडे साफ दुर्लक्ष करण्यात येत आहे.चंद्रभागेच्या पाण्यात प्रदुषण करणार्‍या अशा वाहन धारकांना शनिवारी सकाळी पंढरपूर नगर पालीका पाणीपुरवठा समितीचे सभापती विक्रम शिरसट यंानी गुलाबपुष्प देवून गाधीगीरीने न्यायालयाच्या आदेशाचे पालन करण्याची विनंती केली आहे.
या बाबत अधिक माहीती देताना सभापती विक्रम शिरसट म्हणाले की,मुंबई उच्च न्यायालयाने दिलेला निकाल हा पर्यावरण पुरक आहे.भाविकांना स्नानासाठी पाणी उपलब्ध व्हावे म्हणून चंद्रभागेवर विष्णुपदाशेजारी बंधारा बांधण्यात आला.मात्र जुन्या दगडी पुलानजिकच्या पात्रात चारचाकी वाहने धुण्यात येत असल्याने मोठया प्रमाणात प्रदुषण होत आहे.उच्च न्यायालयाच्य आदेशाची अंमलबजावणी करण्याच्या हेतूने दगडी पुलावरुन नदीच्या पात्रात जेथून वाहने जातात त्या ठिकाणी लोखंडी गेट करण्यात आले आहेत.मात्र सकाळच्या वेळी नेमके हे गेट उघडले जाते व वाहने आत येतात.या ठिकाणी काही झिरो पोलीस वावरत असून वाळवंटात गेलेली वाहने नेमके परत येताना अडवीली जातात व वाहनधारकांना हायकोर्टाच्या आदेशाच्या फलकाकडे बोट दाखवून कारवाईची भीती दाखवीत रक्कमेची मागणी केली जाते.कायद्याचे उल्लंघन झाल्याच्या भीतीने भाविक तक्रार करण्यास धजावत नाहीत.हा प्रकार तातडीने रोखण्यासाठी संबधीत प्रशासनाने तातडीने कारवाई करावी अशी मागणी विक्रम शिरसट यांनी यावेळी केली आहे.
शनीवारी सकाळी नगरसेवक विक्रम शिरसट यांच्या द्रष्टीक्षेपात हा प्रकार आल्यानंतर त्यांनी तातडीने चंद्रभागेच्या पात्रात वाहने धुतली जात असणार्‍या ठिकाणी जावून गांधीगीरी पध्दतीने वाहनधारकांना रोखण्याचा प्रयत्न केला आहे.यावेळी त्यांच्या समवेत लखन ननवरे,किशोर दंदाडे,तुकाराम करकमकर,ज्ञानेश्‍वर वाघमारे,महावीर कांबळे,भुगेश ननवरे,राहुल साठे,सोमनाथ कोळी आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..
अल्पदरात!!
मुख्य संपादक-भगवान वानखेडे
संपर्क- 8308838111

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *