सालाबादप्रमाणे यंदाही महर्षी वाल्मिकी संघाच्यावतीने आद्यक्रांतिकारक राघोजी भांगरे यांच्या स्मृती दिनानिमित्त भव्य सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन दि २१/०५/२०१७ रोजी सायंकाळी ७:०० वाजत आद्यक्रांतिकारक राघोजी भांगरे व्यायाम शाळेच्या पाठीमागे वाल्मिकी भवन येथे संपन्न झाला.
भारतीय समाज जीवनामध्ये विवाह हा अत्यंत पवित्र असा संस्कार मानला जातो, परंतु सध्या विवाह म्हणजे जीवघेणा हुंडा, मानपान व पैशाची उधळपट्टी होत असते परंतु सध्या सोलापूर जिल्हा हा दुष्काळाने ग्रासलेला आहे. या परिस्थितीमध्ये मुला मुलींचे लग्न करणे है आईवडिलांना आर्थिकदृष्ट्या खूप कठीण होत आहे हि समाजाची गरज ओळखून, महर्षी वाल्मिकी संघ यांच्या मार्फत सामुदायिक विवाह सोहळा हि संकल्पना राबवित आहेत. या विवाहामध्ये हुंडा देणे घेणे , अनावश्यक खर्च या गोष्टींना फाटा देऊन ११ जोडप्यांचा सामुदायिक विवाह सामुदायिकरीत्या पार पाडण्यात आला.
महर्षी वाल्मिकी संघातर्फे विवाहाच्यावेळी वधूस शालू. हळदीची साडी, मणीमंगळसूत्र, जोडवे, बिचव्या , मुंडावळ्या, हारतुरे, देण्यात आले व भोजन तसेच नवदापंत्यासाठी संसार उपयोगी भांडी देण्यात आली व वधूवरांचे भव्यदिव्य मिरवणूक काढण्यात आली.
अशी माहिती संस्थापक अध्यक्ष गणेश अंकुशराव यांनी दिली. या विवाह सोहळ्यात प्रमुख पाव्हणे म्हणून माजी आमदार मा. सुधाकरपंत परिचारक, राजन पाटील, कल्याणराव काळे, भगीरथ भालके, साईनाथभाऊ अभंगराव, वसंतराव नेहतराव, बाबासाहेब अधटराव, धनंजय कोथाळकर, अनिल अभंगराव, विक्रम शिरसाट, नागेश आंबेकर, पांडुरंग नाईकवाडी , अण्णासाहेब कोळी, बाबासाहेब कोळी, बाळासाहेब कोरे, उत्तम परचंडे,बाळासाहेब ननवरे, संघटनाचे पदाधिकारी, कर्यकर्ते व जेष्ठ यांच्यासह आदी उपस्थित होते.
हा विवाह सोहळा संपन्न करण्यासाठी निलेश माने ,हणमंत कोरे, संपत सर्जे, बबलू बोराळकर, राहुल परचंडे, रामभाऊ कोळी, विकी अभंगराव, सुरज कांबळे, संजय पगारे, अर्जुन देवकुळे, बालाजी कोळी,सुधाम होमकोबडे, रमेश कोळी, महेश कांबळे, अक्षय म्हेत्रे, प्रकाश मगर, विकी संगीतराव, अवधूत परचंडे, शिवराज ननवरे, श्रीकांत बळवतकर, लहू कांबळे ह्यांच्यासह आदींनी परिश्रम घेतले
या वेळी समाजातील सर्व जातिधर्माचे समाजबांधव व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते..
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..
अल्पदरात!!
मुख्य संपादक-भगवान वानखेडे
संपर्क- 8308838111






