सर्व्हर डाऊन मुळे महाराष्ट्रासह सोलापूर जिल्ह्यातील ऑनलाईन सातबारा उतारा मिळण्यात येताहेत अडचणी

Loading

 

Pandharpur Live Online News : 

सोलापूर जिल्ह्यासह राज्यात महाभूमिलेख सर्व्हरमधील बिघाडामुळे सोमवारपासून (दि.१३) ऑनलाइन सात-बारा उतारा देणे बंद आहे. सात-बारा उतारा मागणीसाठीआलेल्या शेतकऱ्यांना रिकाम्या हाताने परतावे लागत आहे. 

शेतकऱ्यांना विविध संस्था व बँकाकडून घेतलेले कर्ज नूतनीकरण करावयाचे असल्यास शेतकऱ्यांना वारस नोंद, शेती वाटपाची नोंद, शेतकऱ्यांच्या विविध योजना, शेतीच्या मोजणीसाठी, शेती खरेदी विक्री करण्यासाठी डिजिटल सात बाराची गरज भासते. मात्र सर्व्हर डाऊनमुळे शेतकऱ्यांचा खेळखंडोबा झाला आहे.

सर्व्हर मध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने जिल्ह्यातील सेतू सुविधा केंद्रांवर डिजिटल सात-बारा मिळत नसल्याने, सात-बारा मिळवण्यासाठी शेतकरी पूर्वीप्रमाणेच संबंधित गावच्या तलाठ्यांकडे धाव घेत आहेत. तलाठ्यांकडून लॅपटॉप द्वारे सात-बाराची प्रिंट उपलब्ध करून दिली जात होती. परंतु तलाठी यांना देखील उतारे डाउनलोड करण्यासाठी तांत्रिक अडचणी असल्याने उतारे निघत नसल्याने शेतकऱ्यांना उताऱ्याविनाच माघारी परतावे लागत आहे.

शेतकरी विविध कामासाठी सात-बारा मिळविण्यासाठी जिल्ह्यातील सेतू केंद्रांवर गर्दी करतात. परंतु सर्व्हरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने शेतकऱ्यांना सात बारा मिळण्यात अडचणी येत आहेत. सात-बारा डिजिटल झाला असला तरी, त्यासाठी मात्र शेतकऱ्यांना हेलपाटे सहन करावे लागत आहेत.शेतकऱ्यांना उतारे मिळवण्यासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *