👁 3 Views

चॉकलेटचे आमिष दाखवत चिमुकलीला घेऊन जायचा, मग गावात राहणारा आजोबाच

 

पुणे  : चॉकलेटचे आमिष दाखवून घरी नेऊन 9 वर्षाच्या चिमुकलीवर वारंवार बलात्कार करणाऱ्या 70 वर्षाच्या वृद्धाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.


पुण्याच्या मुळशी तालुक्यात ही धक्कदायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पौड पोलीस ठाण्यात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. संतोष वाघू कंधारे असं बेड्या ठोकण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपी आणि पीडित मुलगी एकाच गावातील रहिवासी आहेत. या घटनेमुळे पुन्हा एकदा लहान मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. याप्रकरणी पोलीस सखोल तपास करत आहे


आरोपी हा एकाच गावातील असल्याने त्याची पीडित कुटुंबाशी ओळख होती. याच ओळखीचा फायदा घेत तो मुलीच्या शाळेत जायचा आणि तिच्या शिक्षिकेला तिच्याकडे काम आहे सांगून तिला स्वतःच्या घरी घेऊन घ्यायचा. मग तिच्यावर बलात्कार करायचा. याबाबत कुठे वाच्छता केल्यास जीवे मारण्याची धमकी द्यायचा.

मुलीच्या वडिलांना दारुचे व्यसन असल्याने तिची आई सात वर्षापूर्वी घर सोडून निघून गेली आहे. मुलगी आपल्या मोठ्या बहिणीसह काका-काकू आणि आजोबांसोबत राहते. मंगळवारी मुलीच्या नात्यातील भावाच्या मोबाईलवर आरोपी मुलीसोबत शारीरिक संबंध ठेवतानाचा व्हिडिओ आला. त्याने तो मुलीच्या आजोबांना दाखवला. व्हिडिओवरुन ही आपलीच नात असल्याची खात्री पटताच आजोबांनी मुलीला विश्वासात घेऊन याबाबत विचारले असता मुलीने सर्व सांगितले


यानंतर मुलीच्या आजोबांनी पौड पोलीस ठाणे गाठत सर्व प्रकार सांगितला. पीडित कुटुंबाच्या फिर्यादीवरुन पौड पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली. या घटनेमुळं पौड मध्ये खळबळ उडाली आहे. मुळशी तालुक्यातील विविध संघटनांनी या घटनेचा निषेध केला आहे. तर नराधम आरोपीला फासावर लटकवा अशी मागणी मुळशीकर करत आहेत.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *