खार,वांद्रे,वाकोला परिसरात ६६ लाखाची रक्कम जप्त

Loading


 
लोकसभा निवडणुकीसाठी १७६ – वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघ कार्यक्षेत्रात कार्यरत असलेल्या आचारसंहिता भरारी पथक आणि स्टॅटिक सर्व्हेलियन्स पथकाने मिळून ६६ लाख ४५ हजार ३९० रुपयांच्या बेहिशोबी रोकडचा पर्दाफाश केला आहे.

यामध्ये ५१ लाख ७५ हजाराची रोकड एफएसटीने पकडली असल्याची माहिती सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी जगतसिंग गिरासे यांनी दिली.

वांद्रे ( पूर्व ) येथील सरकारी वसाहतीत १७६ – वांद्रे पूर्व विधानसभा निवडणूक मतदान केंद्र कार्यालय आहे. या केंद्राअंतगर्त आचारसंहिता भरारी पथक आणि स्टॅटिक सर्व्हेलियन्स पथकाकडून बेहिशीबी रोकड बाळगणाऱ्याची तपासणी सुरू आहे. त्यात आचारसंहिता भरारी पथकाने खेरवाडी येथे एका वाहनाची तपासणी केली असता त्यात ५१ लाख ७५ हजार रुपयांची रक्कम आढळली. याप्रकरणी निर्मल नगर पोलीस ठाण्यात जप्तीची कारवाई करण्यात आली आहे.


तसेच स्टॅटिक सर्व्हेलियन्स पथकाकडून खार,वांद्रे, वाकोला परिसरातून १० लाख ९२ हजर ३१० रुपयाची रोकड जप्त करण्यात आली असून १ लाख ६९ हजार आणि ३ सोन्याचे कॉईन्स आणि २ लाख ९ हजार असा मिळून १४ लाख ७० हजार ३१० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.


उत्तर मध्य मुंबईतील महायुतीचे उमेदवार उज्जवल निकम यांचे चिरंजीव खार येथील अनियोग शाळेत प्रचारासाठी आले असता निवडणूक व्हिडियो सर्वेलन्स टीमला मज्जाव केल्याप्रकऱणी शिवसेना पक्षाचा कार्यकर्ता संजय लोखंडे विरोधात निर्मलनगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली आहे.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *