👁 6 Views

सोलापूरमध्ये अवैद्य हातभट्टीवर छापा

 सोलापूर तालुका पोलीस व स्थानिक गुन्हे शाखा पोलीस यांच्यावतीने ऑपरेशन परिवर्तन अभियान अंतर्गत मुळेगांव तांडा व वरळेगांव तांडा येथे गुरुवारी सकाळी अवैद्य हातभट्टी निर्मिती व व्यवसायावर छापा घालण्यात आला.


या छाप्यामध्ये एकूण १० लाख, ५१ हजार रुपयाचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. तर तर ९ आरोपीवर उत्तर तालुका पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती सोलापूर तालुका पोलिसांच्या वतीने देण्यात आली. सोलापूर पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते मॅडम यांच्या संकल्पनेतून सुरू असलेल्या ऑपरेशन परिवर्तन अभियान अंतर्गत सोलापूर ग्रामीण जिल्हयातील अवैध्य रित्या हातभटटया दारू निर्मीती व विक्री करणाऱ्या अवैध्य धंदयावर छापा घालत अवैध्य धंदयाचे समूळ उच्चाटन करण्यात येत आहे.

पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर पोलीस अधीक्षक हिंमत जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती, स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक सुहास जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुवारी सकाळी मुळेगांव तांडा येथील लोकवस्ती सर्च मोहिम राबवून सोलापूर तालुका पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेच्या वतीने मुळेगांव तांडयातील एकूण २८ घरांमध्ये जावून शोध घेतला असता एकूण ९ ठिकाणी छापे मारून एकूण ३०,८०० लिटर गुळमिश्रीत रसायन बॅरेल व सिमेंटच्या हौदामधील ८४० हातभटटी दारू रबरी टयुब व कॅन मधील २४० लिटर गुळपाक असा मिळून एकूण १० लाख ५१ हजार रूपये बॅरेल सह किंमतीचा मुददेमाल मिळून आल्याने बॅरेल व गुळमिश्रीत रसायन बॅरेल तोडून जागेवर पोलिसांनी नष्ट केले.

सदरच्या कारवाईत उत्तर तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे, स्थानिक गुन्हे शाखा सहाय्यक पोलीस निरीक्षक पोरे, सनगल्ले, पोसई खेडकर, पोलीस हवालदार राजाभाउ सुळ, फैयाज बागवान, गोपाळ साखरे, पंकज महिंद्रकर, शिवाजी मोरे, शंकर मुजगोंड, मनोज भंडारी, श्रीषैल माळी, पोलीस नाईक असिफ शेख, किषोर सलगर, विनायक भानवसे, पैगंबर नदाफ, रवी गुंड, स्वप्निल गिरी, महिला पोलीस षारदा घोळवे, पल्लवी इंगळे, यांनी सहभाग घेतला.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *