👁 6 Views

बचत गटाच्या नावाखाली महिलांना 36 लाखांचा गंडा; पितापुत्राला अटक

 बचत गटाच्या नावाखाली महिलांना 36 लाख रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार डिसेंबर 2021 रोजी घडला होता. यामधील आरोपी पिता पुत्राला तब्बल ९ महिन्यांनंतर बेड्या ठोकण्यात बीडच्या आर्थिक गुन्हे शाखेला यश आले आहे.


गेवराईतील महिलांकडून कागदपत्रे घेऊन, परस्पर विविध बँकांकडून कर्ज उचलून, 36 लाखांचा गैरव्यवहार करत पितापुत्र पसार झाले होते. अब्बास महेबूब सय्यद 39 व आवेज अब्बास सय्यद 19, दोघे रा. संजयनगर, गेवराई, हमु, नरे, सिंहगड रोड, पुणे  असे त्या पिता-पुत्राचे नाव आहे.

याविषयी विमलबाई बंडू रोकडे यांनी 28 डिसेंबर 2021 रोजी गेवराई ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून, अब्बास महेबूब व आवेज सय्यद रा.संजयनगर, गेवराई, यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा नोंद झाला.2020 मध्ये विमलबाई व इतर 16 महिलांकडून बचत गटामार्फत लघु उद्योगासाठी कर्जप्रकरणे मंजूर करून देतो म्हणून आधार कार्ड, बँक पासबुक, पॅनकार्ड व इतर कागदपत्रे घेत स्वाक्षऱ्या व अंगठे घेतले. त्यानंतर परस्परच 35 लाख 90 हजार 105 रुपयांचे कर्ज उचलले. याविषयी महिलांकडून ओरड झाल्यावर 2 एकर शेती व घर विकून या त्यांनी पुणे गाठले.


दरम्यान गुन्हा नोंद झाल्यानंतर सात महिने उलटून गेवराई पोलिसांना एकाही आरोपीला अटक करण्यात यश आले नाही. त्यामुळे हे प्रकरण 16 जुलै रोजी पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी तपासकामी आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपवले होते. आणि अखेर आर्थिक गुन्हे शाखेने दोघा पिता पुत्रांना पुण्यातुन बेड्या ठोकल्या आहेत. त्यामुळं आरोपींनी इतर कुणाची फसवणूक केलीय का ? याचा तपास पोलीस करत आहेत.


Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *