👁 5 Views

Pandharpur: कर्मयोगी इन्स्टिट्यूटमध्ये “ऋतुरंग २०२४” मोठ्या उत्साहात संपन्न,हास्यसम्राट फेम प्रा. अजितकुमार कोष्टी यांचा “हसवणूक” या बहारदार कार्यक्रमासह विद्यार्थ्यांकडून बहारदार कलागुणांचं सादरीकरण

Pandharpur live news : श्री पांडुरंग प्रतिष्ठान संचालित कर्मयोगी इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलजी महाविद्यालयामध्ये दि. १२ ते १८ फेब्रुवारी रोजी वार्षिक स्नेहसमेलन “ऋतुरंग २०२४” व क्रीडा स्पर्धा  “रन २०२४” हे कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाले अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस पी पाटील यांनी दिली. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीबरोबर क्रीडा व सांस्कृतिक कलागुणांना वाव देण्यासाठी महाविद्यालयांने क्रीडा स्पर्धा व वार्षिक स्नेहसम्मेलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. “रन २०२४” क्रीडा अंतर्गत क्रिकेट, बॅडमिंटन, चेस, कॅरम, हॉलिबॉल, रनिंग, कबड्डी, अॅथल्याटिक्स अश्या विविध प्रकारच्या क्रीडा स्पर्धा घेण्यात आल्या. यामधील विजेत्या व उपविजेत्या स्पर्धकाला परितोषिक प्रदान करण्यात आले.

“ऋतुरंग २०२४” या संस्कृतिक कार्यक्रमामधुन विद्यार्थ्यानी विविध कला सादर केल्या. तसेच फन फेयर, मिस मॅच डे, बॉलीवुड डे, दांडिया अश्या अनेक सादरीकरणातून तरुणाईच्या जल्लोषाला उधाण आले होते. 

दिनांक १६ फेब्रुवारी रोजी हास्यसम्राट फेम प्रा. अजितकुमार कोष्टी यांचा “हसवणूक” हा बहारदार कार्यक्रम झाला. याद्वारे त्यांनी हास्याचे फटाके फोडून उपस्थितांना खिळवून ठेवले. 

यावेळी विद्यापीठाच्या परीक्षेमध्ये प्रथम तीन क्रमांकाच्या विद्यार्थ्यांना प्रा. अजितकुमार कोष्टी यांच्या हस्ते गौरविण्यात आले तसेच विद्यापीठाच्या स्पर्धेमध्ये व इतर विभागामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणार्‍या विद्यार्थ्यांना प्रा.डॉ.सचिन लादे सरांच्या हस्ते पारितोषिके देण्यात आली. 

प्रा.डॉ.सचिन लादे यांनी मार्गदर्शन करताना विद्यार्थ्यांना यशस्वी होण्यासाठीचा कानमंत्र दिला. सातत्यपूर्ण अभ्यास, संशोधांनामत्क विचारसरणी, कठोर परिश्रम हाच यशस्वी होण्याचा मार्ग आहे असेही त्यांनी नमूद केले.   

श्री पांडुरंग प्रतिष्ठान चे चेअरमन रोहन परिचारक यांनी सर्व कार्यक्रमांना शुभेच्छा दिल्या. सदर कार्यक्रमावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस पी पाटील, कर्मयोगी पॉलिटेक्निक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ ए बी कणसे, रजीस्ट्रार श्री. जी डी वाळके तसेच सर्व प्राध्यापक, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदरच्या क्रीडा स्पर्धेसाठी प्रा. अनिल बाबर तसेच ऋतुरंग या वार्षिक स्नेहसम्मेलनासाठी प्रा. राहुल पांचाळ यांनी समन्वयक म्हणून काम पाहिले.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *