Pandharpur Live: कर्मयोगीमधे वाढतोय पक्ष्यांचा किलबिलाट : प्रथम वर्ष विद्यार्थ्यांचा अनोखा उपक्रम

Loading

Pandharpur: कर्मयोगी इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी शेळवे येथे गेले काही दिवस विविध पक्षांचा वावर वाढला असून महाविद्यालयाचा कॅम्पस हा पक्ष्यांच्या किलबिलाटाने गजबजून जात आहे. याला कारण ही तसेच आहे. जागतिक वसुंधरा दिनाचे औचित्य साधत महाविद्यालयाच्या प्रथम वर्ष्याच्या विद्यार्थ्यानी एक अनोखा उपक्रम राबविला. विद्यार्थ्यानी स्वत: कौशल्यातून पक्ष्यांसाठी लोखंडी पत्र्यापासुन घर तयार केले असून कॅम्पस मध्ये असे ही पक्ष्यांची घरे ठिकठिकाणी लावलेली पाहायला मिळत आहेत. विशेष म्हणजे या निवार्‍यामद्धे पक्ष्यांसाठी खाण्यासाठी अन्न व पाणी यांची ही सोय केलेली आहे. सर्वात महत्वाची बाब म्हणजे पक्षांसाठीची ही घरे विद्यार्थ्यानी स्वत : वर्कशॉप मध्ये तयार केलेली आहेत. या उपक्रमातून विद्यार्थ्यांच्याच्या सर्जननशीलतेला चालना मिळाली असून याचा आनंद विद्यार्थ्यांच्या चेहर्‍यावर पाहायला मिळत आहे. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस पी पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून त्यांना सदर उपक्रमाबादद्ल प्रोत्साहित केले. तसेच पर्यावरण रक्षणासाठी करीत असलेल्या विद्यार्थ्यांच्या उपक्रमाला भविष्यामद्धे ही महाविद्यालयातर्फे सर्वतोपरी मदत केली जाईल अशी ग्वाही ही त्यांनी दिली.


 सध्याचे वाढते तापमानामुळे  सर्वांच्या च शरीराची लाही लाही होत आहे. माणूस वेगवेगळे पर्याय वापरुन उन्हापासुन स्वत:चा बचाव करीत आहे परंतु असे असताना पक्षांसाठी सावली उपलब्ध करून देऊन त्यांना अन्न व पाण्याची सोय करणे हे मोठे काम कंर्मयोगीच्या विद्यार्थ्यांनी केले आहे. यामुळे कर्मयोगीच्या कॅम्पस मध्ये वेगवेगळ्या प्रजातीचे पक्षी पाहावयाला व त्यांचा किलबिलाट अनुभायला मिळत आहे.  

श्री पांडुरंग प्रतिष्ठानचे चेअरमन श्री रोहन परिचारक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस पी पाटील, कर्मयोगी पॉलिटेक्निक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ ए बी कणसे, रजीस्ट्रार श्री. जी डी वाळके, उप प्राचार्य प्रा. जे एल मुडेगावकर, संशोधन अधिष्ठाता डॉ. अभय उत्पात, विभाग प्रमुख प्रा. अभिनंदन देशमाने, प्रा. एस एम लंबे, प्रा. अनिल बाबर, प्रा. डॉ. एस व्ही एकलारकर, प्रा. दिपक भोसले यांनी या उपक्रमाचे भरभरून कौतुक केले. सदर उपक्रमाठी वर्कशॉप प्रशिक्षक ललित फडतरे यांचे मार्गदर्शन लाभले.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *