Solapur Loksabha Election : प्रणिती शिंदे यांच्या शक्तीत भर : भीमा साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सतीश जगताप यांच्यासह संचालकांचा प्रणिती शिंदे यांना पाठींबा! भाजपाला हादरा !!

Loading

Pandharpur Live: मोहोळ तालुक्यातील टाकळी सिकंदर येथील भीमा सहकारी साखर कारखान्याचे व्हॉईस चेअरमन सतीश जगताप यांच्यासह संचालकांनी लोकसभा निवडणुकीसाठी आमदार प्रणिती शिंदे यांना पाठिंबा दिला आहे. तर एकीकडे पंढरपुरातील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना अडचणीत आणून अभिजीत पाटील यांचा पक्ष प्रवेश करून घेण्याचा प्रयत्न करण्यात येत असतानाच दुसरीकडे भाजप खासदार धनंजय महाडिक यांच्या भीमा सहकारी साखर कारखान्याच्या व्हाईस चेअरमन सह संचालक आणि आमदार प्रणिती शिंदे यांना पाठिंबा दिल्याने भाजपला चपराक बसल्याची मोहोळ तालुक्यात चर्चा सुरू आहे.

दरम्यान, जनतेचे नेतृत्व स्वीकारण्यासाठी आपल्याला हा पर्याय निवडावा लागला, अशी प्रतिक्रिया भीमा सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सतीश जगताप यांनी बोलताना दिली आहे. आमदार प्रणिती शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये मंगळवार दिनांक 30 एप्रिल 2024 रोजी सोहाळे येथे भीमा परिवारातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी प्रणिती शिंदे यांना पाठिंबा दिला. यावेळी जगताप बोलत होते.

ज्या सभासदांनी कारखाना आमच्या ताब्यात दिला. ज्या मुद्द्यावर दिला, तोच मुद्दा सोडून दिल्यामुळे कार्यकर्त्यांना सभासदांमध्ये तोंड दाखवायला जागा राहिली नाही, असे यावेळी जगताप यांनी सांगितले आहे. दरम्यान, खासदार धनंजय महाडिक यांचे विश्वासू असणाऱ्या सतीश जगताप आणि इतर संचालकांनी प्रणिती शिंदे यांना पाठिंबा दिल्यामुळे तालुक्यात चर्चेला उधाण आले आहे.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *