Solapur Loksabha Election : काम करणारी वाघीण म्हणजे सोलापूरची लेक प्रणिती शिंदे- विश्वजीत कदम

Loading

 


Pandharpur Live: सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या महाविकास आघाडी व काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवार प्रणिती शिंदे यांच्या प्रचारार्थ मतदारसंघात ठीकठिकाणी माजी मंत्री आमदार विश्वजीत कदम यांच्या जाहीर सभा पार पडल्या. या सभेत बोलताना कदम यांनी सोलापूरची काम करणारी वाघीण म्हणजे प्रणिती ताई शिंदे असे गौरवोद्गार काढत प्रणिती शिंदे यांना बहुमताने विजयी  करून लोकसभेत पाठवण्याचे आव्हान केले. ते सोलापुरातील चांदणी चौक येथे आयोजित जाहीर सभेत बोलत होते.

विश्वजीत कदम पुढे म्हणाले की, प्रणिती शिंदे या विधानसभेत केवळ सोलापूर मध्य या मतदारसंघाचे प्रश्न नाही तर संपूर्ण जिल्ह्यातील शेतकरी, युवकांच्या प्रश्नांवर आवाज उठवताना आम्ही पाहिले आहे. विकासाच्या मुद्द्यावर त्या आक्रमकपणे आपली बाजू मांडताना दिसून येत असत. विधानसभेत त्यांची उपस्थितीही लक्षणीय दिसून येत होती. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचे प्रश्न सुटले पाहिजेत, पाणी, वीज, रस्ते हे प्रश्न सोडवण्यासाठी त्या आग्रही असतात. त्यांची काम करण्याची  पद्धत चांगली असून त्या जनतेचे काम करणाऱ्या सोलापूरच्या वाघीण आहेत, असेही मत कदम यांनी यावेळी व्यक्त केले.

कदम यांच्या पंढरपूर तालुक्यातील सरकोली, गादेगाव आणि सोलापूरमध्ये सभा पार पडल्या यावेळी कदम यांनी महागाई, बेरोजगारी, शेतकऱ्यांचे प्रश्न, कष्टकरी वर्गाच्या समस्या अशा अनेक मुद्द्यांवर आवाज उठवला. दरम्यान, या सभेला सर्वसामान्य नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. 

 यावेळी नगरसेविका वैष्णवीताई अंबादास करगुळे विनोद भोसले, युवा नेते अंबादास बाब करगुळे, माजी महापौर आरिफ शेख, तौफिक पैलवान शेख, बसवराज म्हेत्रे रवि आसादे आपचे शहर अध्यक्ष युवक अध्यक्ष निलेश संगेपाग रूपेश गायकवाड, अंबादास(बाबा) करगुळे  विनोद भोसले, नसरोधीन मुल्ला, मयूर खरात यलप्फा तुपदोळकर, अर्जुन साळवे, अमर गवळी, बाबु भंडारे (लष्कर), मल्लुबाबा म्हेत्रे, अमोल भोसले, अंबादास नाटेकर, राजासाब शेख, सिध्दांत रंगापुरे, बाबा ग्रुप कोनापुरे चाळीतील न्यु तिर्‍हेगाव फाॅरेष्ट चांदणी चौक बुध्दनगर फाॅरेष्ट पदाधिकारी व महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तर पंढरपूरमध्ये भगीरथ भालके, किरण घाडगे, प्रकाश पाटील, दादाराव साठे, नंदकुमार पवार, संभाजी शिंदे, नागेश फाटे आदी सह महाविकास आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते  मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *