कारंजा (वाशिम): एका अल्पवयीन मुलीस एका अल्पवयीन मुलाने बाहेरगावी पळवून नेऊन दोन मित्रांच्या मदतीने तिच्यावर बलात्कार केल्याची घटना २९ डिसेंबर रोजी घडली. या प्रकरणी कारंजा ग्रामीण पोलिसांनी १ जानेवारी रोजी तिघांविरोधात गुन्हा दाखल केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कारंजा तालुक्यातील शेवती येथील एका अल्पवयीन मुलीस एका अल्पवयीन मुलाने बाहेरगावी पळवून नेले. तेथील एका खोलीवर या मुलीला नेण्यात आले. त्यानंतर मुलाने लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार केला. या प्रकरणी दाखल झालेल्या तक्रारीनुसार कारंजा ग्रामीण पोलिसांनी बलात्कार करणार्या मुलासह त्याला मदत करणार्या दोघांवर गुन्हा दाखल असून, पुढील तपास सुरू आहे.