सोलापूर : बेकायदेशीररित्या घरगुती गॅस इंधन म्हणून वाहनात भरत असताना छापा टाकून 9 हजार रुपयांचे साहित्य जप्त करून एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई नई जिंदगी परिसरात मंगळवारी दुपारी करण्यात आली. मनोज गायकवाड यांच्या फिर्यादीवरुन मोसीन उर्फ राजीव महेबुब पटेल यांच्याविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.